Vikrant Rona Trailer: 'विक्रांत रोना'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज, उलगडणार हत्येचे गूढ
या ट्रेलरचे कौतुक सलमान खानने केल आहे. तसेच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर सलमान खानने आपल्या सोशल मीडिया वर लाॅंन्च केला आहे. किच्चा सुदीपच्या एंट्रीपासून ते जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्सपर्यंत, सर्वकाही अगदी जबरदस्त दिसते.
साऊथचा सुपरस्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) आणि जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) यांच्या 'विक्रांत रोना' (Vikran Rona) या चित्रपटाची चाहचे आतुरतेने वाट पाहत आहेत. किच्चा सुदीप आणि जॅकलीन ही जोडी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. मधल्या काळात चित्रपटाशी संबंधित अपडेट्सद्वारे निर्माते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचवेळी, आता त्याचा अधिकृत ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे, ज्यामध्ये किच्चा सुदीपची दमदार स्टाईल पाहायला मिळत आहे. ही कथा आहे एका गावाची आहे जिथे प्रत्येकाला भीती वाटते अशी जागा आहे. पण 'विक्रांत रोना' (किच्चा सुदीप) त्याला घाबरत नाही. विक्रांत, एक पोलीस अधिकारी म्हणून, हत्येचे गूढ उकलण्यासाठी निघाला असताना, त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्याच्या आगमनाने, कथेला एक नवीन वळण मिळते आणि सस्पेन्स वाढत जातो.
'विक्रांत रोना' 3D व्हिज्युअल चित्रपट आहे. या ट्रेलरचे कौतुक सलमान खानने केल आहे. तसेच या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर सलमान खानने आपल्या सोशल मीडिया वर लाॅंन्च केला आहे. किच्चा सुदीपच्या एंट्रीपासून ते जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्सपर्यंत, सर्वकाही अगदी जबरदस्त दिसते. यासोबतच जॅकलिनची ग्लॅमरस स्टाइलही लक्ष वेधून घेते. चाहत्यांनाही ट्रेलर खूप आवडला आहे. (हे देखील वाचा: Raksha Bandhan Trailer: भाऊ आणि बहिणीचं सुंदर नातं उलगडणार, 'रक्षा बंधन'चा ट्रेलर प्रदर्शित)
अनूप भंडारी दिग्दर्शित या चित्रपटात किच्चा सुदीप आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याशिवाय निरुप भंडारी, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव यांच्याही भूमिका आहेत. 'विक्रांत रोना' 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा पॅन इंडिया चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.