Vicky Kaushal चा घोड्यावर उभा राहिलेला फोटो पाहून सोशल मीडियात भडकले युजर्स, दिल्या 'या' प्रतिक्रिया
या फोटोत विकी कौशल हा घोड्याच्या पाठीवर उभा राहिल्याचे दिसून येत असून तो त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
बॉलिवूड मधील अभिनेता विकी कौशल (Vikcy Kaushal) याचा सध्या एक फोटो जोरदार चर्चेत आहे. या फोटोत विकी कौशल हा घोड्याच्या पाठीवर उभा राहिल्याचे दिसून येत असून तो त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. घोड्याच्या पाठीवर उभे राहून आपला तोल सावरताना विकी दिसत आहे. अभिनेत्याने असा दावा केला आहे की, त्याने वेलकम चित्रपटातील अनिल कपूर यांचे पेटिंग पुन्हा तयार केले आहे. थोडक्यात काय की, कपूर यांची मजनू भाईची भुमिका साकारली होती त्यावेळी त्यांनी गाढवाला घोड्यावर उभे केले होते.(Chehre Teaser Released: अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या 'चेहरे' चित्रपटाचा टीझर रिलीज; पहा व्हिडिओ)
इंस्टाग्रावर विकी कौशल याने त्याच्या या स्टंटचा फोटो पोस्ट करत एक कॅप्शन सुद्धा लिहिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, Got a little too inspired by Majnu bhai’s painting this morning. पुढे त्याने अनिल कपूर यांना टॅग सुद्धा केले आहे. यावर युजर्सकडून संताप व्यक्त करण्यात आला असून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने असे म्हटले की, अभिनेत्याचा हा स्टंट म्हणजे जनावरांच्या प्रति दयाळू पणा नाहीच.(Priyanka Chopra ने न्यूयॉर्कमध्ये उघडलं भारतीय रेस्टॉरंट; अभिनेत्रीने दिलं 'हे' नाव, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार)
तर आणखी एका युजर्सने लिहिले की, आपण जनावारांच्या बद्दल विचार करु शकत नाही का. त्याचसोबत दुसऱ्या युजर्सने म्हटले की. घोडा खरंच ठीक आहे का? अशा पद्धतीच्या विविध प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी अजून एकाने म्हटले की, घोड्याच्या पाठीची अत्यंत वाईट अवस्था झाली असणार. विकी तु यापेक्षा ही अधिक चांगले करु शकतो.