Chandra Mohan Passes Away: ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. चंद्र मोहन यांना शनिवारी सकाळी 9.45 वाजता हृदयविकाराच्या झटका आला. त्यानंतर त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Chandra Mohan (PC - Wikimedia Commons)

Chandra Mohan Passes Away: तेलुगू चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चंद्र मोहन (Chandra Mohan) याचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. चंद्र मोहन यांना शनिवारी सकाळी 9.45 वाजता हृदयविकाराच्या झटका आला. त्यानंतर त्यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अभिनेत्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

चंद्र मोहन हे 82 वर्षांचे होते. अभिनेत्यावर सोमवारी हैदराबादमध्ये अंतिम संस्कार होणार आहेत. 'आरआरआर' अभिनेता ज्युनियर एनटीआरनेही चंद्र मोहन यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका करून स्वत:ला विशेष ओळख मिळवून देणारे चंद्रमोहन यांचे अकाली निधन झाले हे ऐकून खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझी मनापासून संवेदना आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. (हेही वाचा - Rashmika Mandanna's Deepfake Video: रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल)

चंद्र मोहन हे ज्येष्ठ अभिनेते असून त्यांनी मुख्यत्वे तेलुगु चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांना दक्षिणेतील एक फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन नंदी पुरस्कार मिळाले आहेत. 'रंगुला रत्नम' सारख्या बॉक्स ऑफिसवरील हिट चित्रपटातील त्याच्या कामगिरीबद्दल त्याला टीकात्मक प्रतिसाद मिळाला. एमजीआरसोबतचा 'नलाई नमाधे' हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट होता.