Varun Dhawan चे लग्नानंतर पहिले ट्विट; मानले चाहत्यांचे आभार
लग्नानंतर त्याने आपले पहिले ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये वरुणने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
Varun Dhawan and Natasha Dalal Wedding: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) दोन दिवसांपूर्वीच नताशा दलाल (Natasha Dalal) सोबत विवाहबद्ध झाला. लग्नानंतर त्याने आपले पहिले ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये वरुणने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, 24 जानेवारी रोजी वरुण धवन ने अलिबाग येथील 'द मेन्शन हाऊस' येथे नताशा दलाल सोबत लग्नगाठ बांधली. (Varun Dhawan-Natasha Dalal Wedding: वरुण धवन-नताशा दलाल यांचे मोठ्या थाटामाटात झाले 'शुभमंगल सावधान', See Pics)
चाहत्यांना धन्यवाद देताना वरुणने ट्विटरवर लिहिले की, "गेल्या काही दिवसांत मला आणि नताशाला खूप सारे प्रेम आणि सकारात्मकता मिळाली आहे. त्यासाठी मी अगदी मनापासून सर्वांचे आभार मानतो."
वरुण धवन ट्विट:
त्यासोबतच वरुणने आपल्या वेडिंग इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे देखील आभार मानले. मॅनेजमेंट कंपनीच्या मेंबर्ससह फोटो शेअर करत वरुणने त्यांना धन्यवाद दिले.
विवाहसोहळ्यानंतर वरुण-नताशा मुंबईला परतले असून ते लवकरच बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करतील, अशी चर्चा होती. मात्र वरुणचे काका अनिल धवन यांनी मीडिया रिपोर्ट्सचे खंडन करत सध्या कोणतीही रिसेप्शन पार्टी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, नताशा दलाल ही वरुण धवनची बालमैत्रिण असून कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि लॉन्ग रिलेशनशीपनंतर दोघेही विवाहबद्ध झाले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायाचे झाल्याचे अलिकडेच वरुण धवनचा कुली नं. 1 सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यात वरुण आणि सारा अली खान ही जोडी पाहायला मिळाली. त्यानंतर Koochie Koochie Hota Hai, रणभूमि, मिस्टर लेले या सिनेमांतून वरुण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.