प्रसिद्ध डिझायनर नताशा दलाल सोबत वरुण धवन गोव्यात करणार लग्न? Details Inside
परंतु मागील काही दिवसांपासून मात्र त्याच्या लग्नाच्या चर्चांना अगदी उधाण आलं आहे. वरूनच लग्न या वर्षी होणार असं बोललं जात आहे.
Varun Dhawan's Marriage: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन नेहमीच त्याच्या हटके लूक्समुळे चर्चेत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून मात्र त्याच्या लग्नाच्या चर्चांना अगदी उधाण आलं आहे. वरूनच लग्न या वर्षी होणार असं बोललं जात आहे. स्पॉटबॉयने सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले आहे की वरुण धवन त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत यावर्षी त्याच्या वाढदिवशी म्हणजेच 24 एप्रिल रोजी लग्न करणार आहे. खरंतर, अनेक वृत्तसंस्थांनी या दोघांचे लग्न गेल्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये होणार असल्याचे म्हटले होते. परंतु, वरुण त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ही तारीख पुढे गेली असं म्हटलं जातंय.
वरुण धवनचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डान्सर 3 डी' लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर त्याच्या दुसऱ्या चित्रपटाचे म्हणजेच 'कुली नंबर 1' चे शूटिंगही जवळजवळ पूर्ण झाले आहे. त्याने शशांक खेतानचा 'मिस्टर लेले' हा चित्रपट देखील साइन केला आहे, परंतु, त्याचे वेळापत्रक अशा पद्धतीने आयोजित केले जात आहे की वरुणला त्याच्या लग्नासाठी तसेच हनिमूनसाठी योग्य वेळ मिळेल.
मनीष मल्होत्रा यांच्यासोबत स्वतः डिझायनर नताशा दलाल हे वरुण आणि तिच्या लग्नाच्या ड्रेसेसच्या डिझाइनवर काम करणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. तसेच वरुण आणि नताशाचे डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात करण्याचे नियोजन केले जात असल्याचेही बोलले जात आहे.
नेहा कक्कर आणि आदित्य नारायण करणार 'या' तारखेला लग्न; Details Inside
दरम्यान, वरुणची होणारी बायको नताशा दलाल हिच्याबद्दल बोलायचं झालं तर तिने फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात पदवी मिळविली आहे. 2013 मध्ये नताशाने फॅशन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी न्यूयॉर्कमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतल्यानंतर नताशाने स्वतः डिझायनिंग क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली आणि आज ती या क्षेत्रातील एक नावाजलेली व्यक्ती आहे.