लवकरच Varun Dhawan करणार डिजिटल डेब्यू; दिसणार Priyanka Chopra अभिनित Citadel च्या हिंदी आवृत्तीमध्ये- Reports
हिंदी आवृत्ती लिहिण्याची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी 'द फॅमिली मॅन' ही सुपरहिट वेब सिरीज बनवणाऱ्या राज आणि डीके यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार त्याचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होईल
वरूण धवनचे (Varun Dhawan) आधीचे चित्रपट कदाचित जास्त चालले नसतील किंवा ते प्रेक्षकांना मनापासून आवडलेही नसतील, परंतु याचा त्याच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला नाही. डेविड धवनचा मुलगा म्हणून वरूणच्या खात्यात एकानंतर एक चित्रपट पडतच गेले. आता वरुण धवन डिजिटल जगातही पदार्पण करणार आहे. प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) अमेरिकन ड्रामा सिरीज 'सिटाडेल' (Citadel) च्या हिंदी आवृत्तीद्वारे तो डिजिटल डेब्यू करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरूण धवनने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओची आंतरराष्ट्रीय वेब सीरीज 'सिटाडेल' च्या हिंदी आवृत्तीबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
सध्या 'सिटाडेल'च्या इंग्रजी आवृत्तीचे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे. या सिरीजमध्ये प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये ती एका गुप्तहेरची भूमिका साकारत आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'चा रिचर्ड मॅडेन आणि पेड्रो लिआंड्रो हेदेखील यामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत. ही सिरीज 2022 मध्ये प्रदर्शित होऊ शकते.
आता वरुण धवन त्याच्या हिंदी आवृत्तीत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिंदी आवृत्ती लिहिण्याची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी 'द फॅमिली मॅन' ही सुपरहिट वेब सिरीज बनवणाऱ्या राज आणि डीके यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार त्याचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होईल. लवकरच या अॅक्शन अॅडव्हेंचर सिरीजच्या हिंदी आवृत्तीमधील कलाकारांच्या नावांची घोषणा होणार आहे.
हिंदी आवृत्तीचे शुटींग भारतामध्ये होणार आहे. असे सांगितले जात आहे की, वरुण धवन या सिरीजबद्दल खूप उत्साही आहे कारण ओटीटीवरील ही त्याची पहिली सिरीज आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सनी ओटीटी डेब्यू केला आहे. सुष्मिता सेन नंतर शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, जुही चावला यांची नावे यात समाविष्ट झाली आहेत. आता माहिती मिळत आहे की, अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रादेखील डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाली आहे. (हेही वाचा: Akshay Kumar याचा सिनेमा Bell Bottom येत्या 16 सप्टेंबरला ओटीटीवर होणार प्रदर्शित)
अहवालानुसार, शिल्पाची ओटीटी डेब्यू सिरीज ही फिमेल सेंट्रीक असेल. असे म्हटले जात आहे की ही भूमिका जवळपास सुष्मिता सेनच्या आर्यासारखी असू शकते. या प्रकल्पाबाबत शिल्पाशी अंतिम चर्चा चालू आहे.