Varun Dhawan Birthday Special: वरुण धवन याच्या या '5' सिनेमातील अभिनयामुळे तो ठरला स्टार!
'स्टुडेंट ऑफ द ईअर' मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर वरुणने हिट सिनेमा देण्याचा सिलसिला सुरुच ठेवला. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया वरुण धवन याला हिट ठरवलेले त्याचे '5' सिनेमे...
Happy Birthday Varun Dhawan: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. वरुण धवनचा जन्म 24 एप्रिल 1987 मध्ये मुंबईत झाला. त्याने 2012 आलेल्या 'स्टुडेंट ऑफ द ईअर' (Student Of The Year) मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर वरुणने हिट सिनेमा देण्याचा सिलसिला सुरुच ठेवला. (लगीनघाई! अभिनेता वरुण धवन लवकरच बोहल्यावर चढणार?)
वरुण धवनचा लूक, स्टाईल, अभिनय या सगळ्याचीच तरुणाईला भूरळ पडली आणि त्याचा चाहतावर्ग वाढत गेला. प्रत्येक सिनेमात तितक्याच ताकदीने काम करणाऱ्या वरुण धवनचे काही सिनेमे तो वरुण उत्तम अभिनेता आहे, हे सिद्ध करतात. त्याच्या वाढदिवासानिमित्त जाणून घेऊया वरुण धवन याच्या अभिनयाचा कस लागलेले 5 सिनेमे...
बदलापूर
श्रीराम राघवन दिग्दर्शित बदलापूर सिनेमाने वरुण धवनच्या करिअरला मॅजिक टक दिला असे म्हणायला हरकत नाही. या सिनेमात वरुणने कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूचा बदला घेणाऱ्या व्यक्तीची व्यक्तीरेखा अतिशय अप्रतिमरित्या साकारली आहे.
बद्रिनाथ की दुल्हनिया
या सिनेमातील वरुणची भूमिका काहीशी खुळचट पण प्रेमळ मुलाची होती. या सिनेमासाठी त्याने केलेले शब्दोउच्चार आणि देहबोली यामुळे आलिया भट्टसोबत वरुण अतिशय परफेक्ट दिसला आहे.
ऑक्टोबर
जुडवा 2 सिनेमातील वरुण धवनचा अभिनय पाहुन दिग्दर्शक शुजीत सरकर यांनी त्याला ऑक्टोबर सिनेमासाठी विचारले. या सिनेमाही वरुण धवनने उत्तम अभिनयाने खुलवला आहे.
सुई धागा
अतिशय साध्या सरळ व्यक्तीची माऊजी ही भूमिका वरुणने यात साकारली आहे. सिनेमातील त्याच्या सहज सुंदर अभिनयामुळे वरुणला अशा भूमिकात पाहणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
कलंक
अलिकडेच प्रदर्शित झालेला आणि बहुचर्चित असा सिनेमा कलंक सिनेमात वरुणने जफर ही व्यक्तीरेखा साकारली आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नसला तरी वरुण धवनच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे.
केवळ हे 5 सिनेमेच नाही तर यांसारख्या अनेक सिनेमातून वरुण धवन याने आपल्या अभियन कौशल्याची चुणूक दाखवली आहे. लवकरच वरुण धवनचे कुली नं. 1 चा रिमेक, रंगभूमी, स्ट्रीट डान्सर 3D यांसारखे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)