बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबत 'बेलबॉटम' चित्रपटात झळकणार वाणी कपूर; अभिनेत्रीने सोशल मिडियावरुन व्यक्त केला आनंद

वाणी कपूर ने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत 'मला अक्षय सरांसोबत स्क्रीनवर काम करण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड खूश आहे. तसेच आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला घेऊनही खूश आहे. यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मला घरी असल्याची भावना निर्माण होत आहे. आशा आहे की हा उत्साह स्क्रीनवर अगदी सुंदर रित्या समोर येईल', असे म्हटले आहे.

Vaani Kapoor And Akshay Kumar (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आगामी जासूस थ्रिलर चित्रपट 'बेलबॉटम' (Bell Bottom) मध्ये सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) सह झळकणार आहे. अक्षयसोबतची वाणीचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे वाणी भलतीच खूश आहे. ही आनंदाची बातमी वाणीने आपल्या सोशल अकाउंटवरुन शेअर केली आहे. "मला अक्षय कुमार सोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड खूश आहे" असे वाणीने सांगितले आहे.

वाणी कपूर ने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत 'मला अक्षय सरांसोबत स्क्रीनवर काम करण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड खूश आहे. तसेच आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला घेऊनही खूश आहे. यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मला घरी असल्याची भावना निर्माण होत आहे. आशा आहे की हा उत्साह स्क्रीनवर अगदी सुंदर रित्या समोर येईल', असे म्हटले आहे. अक्षय कुमारच्या Laxmmi Bomb पासून ते आलिया भट्टचा Sadak 2, अजय देवगणचा Bhuj: The Pride of India असे 7 मोठे बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार Disney+ Hotstar वर; जाणून घ्या डीटेल्स

 

View this post on Instagram

 

Super Super Thrilled & Excited for this one !! Teaming up with the one & only @akshaykumar Sir 💥 🤩Can't wait !!! #Bellbottom Let's get this started ❤️ #VashuBhagnani @ranjitmtewari @jackkybhagnani @deepshikhadeshmukh @onlyemmay @madhubhojwani @nikkhiladvani @emmayentertainment @pooja_ent

A post shared by Vaani Kapoor (@_vaanikapoor_) on

या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे आणि 1980 दशकातील आहे. यात भारताच्या एका विस्मरण झालेल्या नायकांबद्दल सागंण्यात आले आहे. रंजीत एम.तिवारी द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात या वर्षाच्या शेवटी होईल. ही कथा असीम अरोड़ा आणि परवेज शेख लिहिली आहे.

या चित्रपटाच्या कलाकारांविषयी बोलायचे झाले तर, निर्माता जॅकी भगनानी ने सांगितले की , कथेच्या मागणी नव्याने जोडली गेली. प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या फिल्मला प्रोड्यूस करणारे जॅकीने सांगितले की, "वाणी एक बुद्धिमान आणि प्रभावी अभिनेत्री आहे आणि तिचे आजतागायत केलेले काम फार आवडले आहे." बेलबॉटम हा चित्रपट 2 एप्रिल 2021 ला प्रदर्शित होईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now