उर्वशी रौतेला हिचे फेसबुक अकाऊंट हॅक; पोस्टवर प्रतिक्रीया न देण्याचे चाहत्यांना आवाहन (View Tweets)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा आपल्या हॉट अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते. मात्र आता उर्वशीचे नाव चर्चेत येण्यामागे वेगळेच कारण आहे. उर्वशीच्या ट्विटर पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फेसबुक अकाऊंट हॅक झाले असल्याचे उर्वशीने ट्विटरवर पोस्ट करत सांगितले.

उर्वशी रौतेला हिचे फेसबुक अकाऊंट हॅक; पोस्टवर प्रतिक्रीया न देण्याचे चाहत्यांना आवाहन (View Tweets)
Urvashi Rautela (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अनेकदा आपल्या हॉट अंदाजामुळे चांगलीच चर्चेत असते. आता मात्र उर्वशीचे नाव चर्चेत येण्यामागे वेगळेच कारण आहे. उर्वशीच्या ट्विटर पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फेसबुक अकाऊंट (Facebook Account) हॅक झाले असल्याचे उर्वशीने ट्विटरवर पोस्ट करत सांगितले आहे. त्यामुळे फेसबुकवर करण्यात येणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष करा. त्यावर कोणतीही प्रतिक्रीया देऊ नका असेही तिने चाहत्यांना सूचित केले आहे. तसंच तिने याबद्दल मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. यावर पोलिसांनी तुमची तक्रार सायबर पोलिसांकडे पाठवण्यात आली असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यावर उर्वशीने 'धन्यवाद' असा रिप्लाय करत आता हॅकर पैशांची मागणी करत असल्याचे सांगितले आहे.

ट्विटमध्ये उर्वशीने लिहिले की, "माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले असून मी किंवा माझ्या टीमकडून करण्यात येणाऱ्या पोस्टवर काहीही प्रतिक्रीया देऊ नका."  (उर्वशी रौतेला चे निळ्याशार समुद्रातील निळ्या रंगाच्या बिकिनीमधील सेक्सी फोटोज फोटोज पाहून चाहते झाले पाणी-पाणी)

पहा ट्विट:

उर्वशीचे अकाऊंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील ऑक्टोबर 2017 मध्ये उर्वशीचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते आणि त्याचा गैरवापरही करण्यात आला होता. त्यावेळेस देखील तिने अकाऊंट झाले असून शेअर करण्यात आलेले ट्विट्स तिने केले नसल्याचे स्पष्ट केले होते.

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2020 12:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).