Urvashi Rautela Hot bikini Photo: उर्वशी रौतेला चे निळ्याशार समुद्रातील निळ्या रंगाच्या बिकिनीमधील सेक्सी फोटोज फोटोज पाहून चाहते झाले पाणी-पाणी
Urvashi Rautela (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि उत्कृष्ट मॉडेल उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या सोशल मिडियावर बरीच धुमाकूळ घालतेय. तिचे एकाहून एक सेक्सी आणि हॉट फोटोजने सोशल मिडियावर अक्षरश: आग लावली आहे. उर्वशी रौतेला सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती बरेच टिकटॉक व्हिडिओ, बोल्ड फोटोशूट शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या इन्स्टा अकाउंटवर तिचा निळ्याशार समुद्राजवळील बिकिनीमधील हॉट फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहे. हा फोटो शेअर करताच या फोटोला तिच्या इन्स्टा अकाउंटवर 4 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची बिकिनी घातली असून डोळ्यांना गॉगल लावला आहे. ओल्या केसांमधील आणि हॉट बिकिनीमधील उर्वशी सध्या सोशल मिडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

पाहा फोटो:

हेदेखील वाचा- हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे ब्लॅक गाऊनमधील बोल्ड फोटोशूट पाहून चाहते घायाळ, पाहा फोटोज

मालदिवच्या समुद्रातील हे फोटो आहेत. या फोटोखाली तिने 'आनंद पसरवा, किटाणू नाही' असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांनी हॉट, सेक्सी अशा प्रतिक्रिया देऊन आगीचे इमोजी देखील कमेंट बॉक्समध्ये पाठवले आहे.

'सिंग साहब दी ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे AMAZON FILMFARE AWARDS 2020 मधील ब्लॅक गाऊनमधील फोटो सोशल मिडियावर बराच व्हायरल होत होता.