Republic Day Movies: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 'हे' हिंदी चित्रपट झाले होते रिलीज; बॉक्स ऑफिसवर रचला होता इतिहास

Republic Day Movies (PC - Twitter)

Republic Day Movies: 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा दिवस भारतासाठी खूप खास आहे. प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण देशभक्तीत मग्न असतो. प्रजासत्ताक दिनी अनेकजण देशभक्तीपर चित्रपट पाहात असतात. बॉलिवूडचे अनेक चित्रपट आहेत, जे प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित झालेले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. हे चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंत: करणात देशप्रेमाची भावना वाढल्याशिवाय राहणार नाही. 26 जानेवारी च्या या खास प्रसंगी आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या आसपास पडद्यावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांविषयी सांगणार आहोत. (वाचा - Republic Day 2021 Messages in Hindi & HD Photos: प्रजासत्ताक दिनानिमित्त WhatsApp Status, Patriotic Quotes, SMS, Greetings, Images, Wallpapers शेअर करून आपल्या मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा!)

एयरलिफ्ट (Airlift) -

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि निम्रत कौर (Nimrat Kaur) यांचा ‘एयरलिफ्ट’ चित्रपट प्रदर्शित होऊन पाच वर्षे लोटली आहेत. परंतु, आजही या चित्रपटाने लोकांच्या मनावर आपली खास छाप सोडली आहे. या चित्रपटात 1990 च्या गल्फ वॉर दाखवण्यात आला आहे. जेव्हा 1,70,000 भारतीयांना कुवेतमधून देशाच्या भूमीत हलवण्यात आले होते. 26 जानेवारीच्या अगोदर हा चित्रपट 23 जानेवारी रोजी पडद्यावर आला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. (वाचा - Happy Republic Day 2021 Messages in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Wishes, Images, WhatsApp Stickers द्वारे देऊन साजरा करा राष्ट्रीय सण!)

रंग दे बसंती -

आमिर खानचा (Aamir Khan) स्टारर फिल्म रंग दे बसंती (Rang De Basanti) हा 26 जानेवारी 2006 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील बलिदान, समर्पण, देशाबद्दलचे प्रेम दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणाच्याही मनात देशभक्तीची भावना जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. या चित्रपटाने जगभरात 96 कोटींची कमाई केली होती.

जय हो -

24 जानेवारीला सलमान खानचा 'जय हो' पडद्यावर आला होता. या चित्रपटात सलमानने एका माजी सैनिकाची भूमिका साकारली होती, तो एक सामान्य माणसाप्रमाणे आपले आयुष्य कसे जगतो यावर हा चित्रपट आहे. सोहेल खान दिग्दर्शित या चित्रपटाने पडद्यावर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

बेबी (Baby) -

23 जानेवारी 2015 रोजी अक्षय कुमारचा स्टारर फिल्म बेबी पडद्यावर आला. या चित्रपटामध्ये गुप्त मोहीम राबविणाऱ्या भारतीय बहाद्दरांची कहाणी आहे. या चित्रपटात ताप्सी पन्नू यांच्यासह अनेक कलाकार पाहायला मिळाले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif