Kiccha Sudeep On Bollywood: बॉलिवूडची अवस्था अगदी विराट कोहलीसारखी; किच्चा सुदीपनं केलं वक्तव्य

सलमान खानने प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचे सांगत बॉलिवूडच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला, तर किच्चा सुदीपने बॉलिवूडच्या स्थितीची तुलना विराट कोहलीच्या फॉर्मशी केली.

Kiccha Sudeep (Photo Credit - Twitter)

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील कलाकार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांने बाॅलिवूड (Bollywood) संदर्भात वक्तव्य केल आहे. तो म्हणाला बाॅलिवूडची अवस्था आता विराट कोहली (Virat Kohli) सारखी आहे. त्याने केलेल्या विधानामुळे आता बाॅलिवूडमध्ये केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. मुंबईत किच्चा सुदीपचा आगामी चित्रपट 'विक्रांत रोना'चा (Vikrant Rona) प्रमोशनल इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. कडेकोट बंदोबस्तात या कार्यक्रमाला बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) उपस्थित होता. सलमान खान किचा सुदीपच्या चित्रपटाच्या हिंदी भाषेचे प्रमोशन करत आहे. इव्हेंटमध्ये, दोन्ही सुपरस्टार सध्या सुरू असलेल्या दक्षिण विरुद्ध बॉलिवूड वादाबद्दल बोलले. सलमान खानने प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचे सांगत बॉलिवूडच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला, तर किच्चा सुदीपने बॉलिवूडच्या स्थितीची तुलना विराट कोहलीच्या फॉर्मशी केली.

काय म्हणाला किच्चा सुदीप? 

सुदीप कार्यक्रमामध्ये म्हणाला, 'वर्षभरात अनेक चित्रपटांची निर्मिती केली जाते. प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असं होत नाही. काही चित्रपट खूप चांगले प्रदर्शन करतात, तर काही चित्रपट तितकी चांगली कामगिरी करत नाहीत. याचा अर्थ असा नाही की बॉलीवूड चांगले काम करत नाही, असं अनेकांचे मत आहे.  बॉलिवूडमध्ये चांगल्या चित्रपटांची निर्मिती झाली नसती तर त्यांच्याकडे एवढे महान कलाकार नसते. बॉलिवूडनं चांगलं काम केलं नसतं तर  एवढी वर्ष ही इंडस्ट्री टिकली असती का? जसे विराट कोहली काही दिवस फॉर्ममध्ये नसला तरी त्याचे रेकॉर्ड कोणी त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही. तसंच बॉलिवूडचं देखील आहे. (हे देखील वाचा: Shreyas Talpade साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका; पहा Emergency सिनेमा मधील झलक)

हा चित्रपट पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित 

विशेष म्हणजे, अनूप भंडारी दिग्दर्शित 'विक्रांत रोना' 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. किच्चा व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. विक्रांत रोनामध्ये निरुप भंडारी, नीता अशोक, रविशंकर गौडा, मधुसूदन राव आणि वासुकी वैभव सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. हा काल्पनिक अॅक्शन थ्रिलर कन्नड, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.