The Kashmir Files OTT Release: विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित; लवकरच टीव्हीवरही दाखवण्यात येणार
मला आनंद आहे की या चित्रपटाला थिएटरमध्ये जगभरात इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
भारतातील एक मोठा होम व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ZEE5 लवकरच लोकांसाठी ब्लॉकबस्टर चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'चा (The Kashmir Files) प्रीमियर करणार आहे. काश्मिरी पंडितांच्या निर्गमनावर बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमी वेळेत 250 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने महामारीनंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आता विवेक अग्निहोत्रीचा हा चित्रपट ZEE5 वर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड यासारख्या अनेक भाषांमध्ये 190 हून अधिक देशांमध्ये दाखवला जाईल.
झी स्टुडिओज आणि तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक रंजन अग्निहोत्री निर्मित, 'द काश्मीर फाईल्स' विवेक अग्निहोत्री यांनी लिहिला असून त्यांनीच दिग्दर्शित केला आहे. यात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांच्यासह इतरही अनेक प्रतिभावान कलाकारांच्या भूमिका आहेत. काश्मिरी पंडित समुदायाच्या नरसंहारात बळी पडलेल्या पहिल्या पिढीच्या व्हिडिओ मुलाखतींवर आधारित, 'द काश्मीर फाइल्स' हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे.
या चित्रपटाला समीक्षक आणि चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आता हा चित्रपट ओटीटी व्यासपीठ Zee5 वर प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. परंतु त्याची तारीख अद्याप समोर आली नाही. वृत्तानुसार, झी नेटवर्कने या चित्रपटाचे टीव्हीचे हक्क देखील घेतले आहेत आणि तो मे महिन्यात टीव्हीवर प्रसारित केला जाऊ शकतो. मात्र त्याचीही तारीख अद्याप समोर आलेली नाही. विवेक अग्निहोत्रीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने ओटीटीवर 'द काश्मीर फाइल्स'च्या प्रदर्शनाविषयी सांगितले आहे. (हेही वाचा: विवेक अग्निहोत्री म्हणाले, 'द दिल्ली फाइल्स' केवळ दिल्लीचेच नाही तर तामिळनाडूचे सत्य सांगेल)
दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री म्हणतात, ‘द काश्मीर फाईल्स हा केवळ एक चित्रपट नसून तो एक भावना आणि चळवळ आहे. मला आनंद आहे की या चित्रपटाला थिएटरमध्ये जगभरात इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि आता हा भारतातील सर्वात मोठे घरगुती व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ZEE5 प्रदर्शित होणार आहे.