Diwali 2020: बच्चन कुटुंबिय यंदा दिवाळी पार्टीचं आयोजन करणार नाहीत; अभिषेक बच्चन ने सांगितलं 'हे' कारण

मीडिया रिपोर्टनुसार, बच्चन कुटुंब या दिवाळीत त्यांच्या घरी भव्य पार्टीचे आयोजन करणार नाही. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी मुलाखतीदरम्यान यासंदर्भात पुष्टी केली आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (Photo Credits: Instagram)

Diwali 2020: दिवाळीचा सण देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टी (Diwali Party) मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. परंतु, यावर्षी बॉलिवूडमध्येही कोरोना काळात दिवाळीची चमक फिकट झाल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबिय (Bachchan Family) दरवर्षी दिवाळी पार्टीचे आयोजित करत असते. मीडिया रिपोर्टनुसार, बच्चन कुटुंब या दिवाळीत त्यांच्या घरी भव्य पार्टीचे आयोजन करणार नाही. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी मुलाखतीदरम्यान यासंदर्भात पुष्टी केली आहे.

अभिषेक बच्चनने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतील म्हटलं आहे की, "हे खरं आहे. आमच्या कुटुंबातील एका सदस्याचा यावर्षी मृत्यू झाला आहे. माझ्या बहिणीची सासू रितु नंदाचा मृत्यू झाला. तसेच कोरोना काळात पार्टीचे आयोजन कोण करते? सध्या संपूर्ण मानवी सभ्यता सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. या काळात आपण शक्य तितकी सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच सोशल डिस्टन्सिंगची देखील काळजी घेतली पाहिजे. कोरोनाची कोणतीही हमी नाही. कारण हा आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. दिवाळी पार्टी आणि सामाजिक प्रसंग हे आता दूरचे स्वप्न आहे." (हेही वाचा - Kangana Ranaut Trolls Joe Biden: कंगना रनौत ने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांना केले ट्रोल, म्हणाली 1 वर्ष सुद्धा टिकणार नाही)

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना 12 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी अभिषेक बच्चननंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चनची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.

 

View this post on Instagram

 

Happy birthday Wifey. Thank you for everything! All that you do for us and mean to us. May you always smile and be happy. We love you eternally. I love you. ❤️

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने 1 नोव्हेंबर ला आपला 47 वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्याला या दिवशी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ऐश्वर्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला वाढदिवस खास बनवणाऱ्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले होते. तसेच आपली मुलगी आराध्यासोबतचे फोटो शेअर केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif