IB 71 Teaser Release: अभिनेता विद्युत जामवालच्या अॅक्शन-थ्रिलर IB 71 चा टीझर रिलीज; 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट

47 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अनुपम खेर (Anupam Kher) विद्युत जामवालसोबत गुप्त मोहिमेची योजना आखताना दिसत आहेत.

IB 71 Teaser (PC - You Tube)

IB 71 Teaser Release: बॉलीवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) चा पुढचा चित्रपट 'IB 71' 12 मे रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. विद्युतने इन्स्टाग्रामवर पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. 47 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अनुपम खेर (Anupam Kher) विद्युत जामवालसोबत गुप्त मोहिमेची योजना आखताना दिसत आहेत.

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना विद्युत जामवालने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले आहे की, टॉप सीक्रेट आता बाहेर आले आहे. तुमच्यासाठी सादर करत आहे IB 71, 1971 चे युद्ध जिंकणारे भारताचे गुप्तचर अभियान. (हेही वाचा - KGF 3 Teaser: यश-स्टारर अॅक्शन चित्रपट 'केजीएफ 3' चा टीझर रिलीज, Watch Video)

'IB 71' चित्रपट भारतीय गुप्तचर संस्था आणि पाकिस्तानी एजन्सी यांच्यातील दोन आघाडीच्या युद्धाभोवती फिरतो. संकल्प रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीजच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटात अश्वथ भट्टही दिसणार आहे. ज्याने हैदर, राझी आणि लम्हा: द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मीर सारख्या चित्रपटात काम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

अलीकडेच विद्युत जामवालाने त्याचा मित्र आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची आठवण करून एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. विद्युतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर सिद्धार्थसोबत पोज देतानाचा फोटो पोस्ट केला. यात दोघे जिमच्या उपकरणांजवळ पोज देताना दिसले होते.