बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान च्या लाईव्ह इंटरव्यू दरम्यान दिसला तैमूर; पहा क्यूट व्हिडिओ

Saif Ali Khan, Taimur Ali Khan (PC -

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाउन (Lockdown) पाळण्यात येत आहे. त्यामुळे सर्वचं आपल्या घरात कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशातचं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज घरातून माध्यमांना मुलाखत देत आहेत. अलिकडेचं बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) ने एका मीडियाला घरातूनचं लाईव्ह इंटरव्यू दिला. या मुलाखतीदरम्यान, सैफचा मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Khan) देखील पाहायला मिळाला.

सैफ अली खान पत्रकार अनुपमा चोपड़ा (Anupama Chopra) यांच्यासोबत आपल्या करिअर विषयी बोलत असताना तैमूरही त्याठिकाणी आला. तैमूरला पाहून अनुपमा जोरात हसू लागली. तसेच सैफनेदेखील आपल्या परिवारातील लोकांना तैमूरला सांभाळा, अशी सुचना दिली. या सर्व प्रकारानंतर सैफने तैमूरला अनुपमासोबत ओळख करून दिली. या सर्व प्रसंगाचा क्युट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput चे सकारात्मक विचार, स्वप्न, आशा-आकांक्षाचा खजिना चाहत्यांसाठी selfmusing.com च्या माध्यमातून कुटुंबीयांनी केला खुला)

 

View this post on Instagram

 

A new series that I am really excited about - My Movie Milestone in which we chat with artists about a career defining film. We kick off with Saif Ali Khan talking about his memorable turn as Langda Tyagi in Omkara. While we were chatting, Taimur made a delightful guest appearance! You can tune in for the LIVE premiere on YouTube at 5pm tomorrow. #Bollywood #bestjobever

A post shared by Anupama Chopra (@anupama.chopra) on

सोशल मीडियावर तैमूरचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. तैमूर अगदी जन्मापासून मीडिया स्पॉटलाइटमध्ये आहे. अतिशय कमी वयात तैमूर सोशल मीडियावर प्रसिद्ध स्टारकिड बनला. त्याचा निरागस चेहरा आणि क्युटनेस लोकांची नेहमी मने जिंकतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now