वाढदिवसा दिवशी तैमूर अली खान याने हातावर काढला टॅट्यू (Watch Video)

सध्या तैमूरचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तैमूर हातावर टॅट्यू काढताना दिसत आहे. पहा वाढदिवसा दिवशी व्हायरल होणारा तैमूरचा हा व्हिडिओ...

Taimur Ali Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा तैमूर अली खान नेहमीच चर्चेत असतो. लोकप्रिय स्टार किड्स पैकी एक असलेल्या तैमूर (Taimur) चा आज वाढदिवस आहे. तैमूर आज 4 वर्षांचा झाला. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर कलाकार, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करीना कपूर खान ने देखील स्पेशल पोस्ट करत तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सध्या तैमूरचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तैमूर हातावर टॅट्यू काढताना दिसत आहे. (करीना कपूर हिने तैमुरच्या फोटोंचा व्हिडिओ शेअर करुन आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Watch Video)

तैमूरचा हा व्हिडिओ फॅनपेजकडून शेअर करण्यात आला असून यात तो अगदी शांतपणे उभा असून हातावर टॅट्यू काढून घेत आहे. या व्हिडिओत त्याने सफेद रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची पॅंट घातली आहे. तैमूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर हिट ठरत आहे. (तैमूर अली खान च्या वाढदिवसानिमित्त करीना कपूर ने केली नव्या प्रेग्नेंसी बुक ची घोषणा; Pregnancy Bible लवकरच होणार लॉन्च)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Taimur ali khan (@taimuralikhanpataudiakanawab)

तैमूरचे अनेक व्हिडिओज, फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यापूर्वी फोटोग्राफर्संना नो फोटोज असं म्हणत तैमूरने फोटो काढण्यास नकार दिला होता. तो ही व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत होता.

दरम्यान, करीना कपूर खान ने देखील तैमूरच्या बर्थडे औचित्य साधत तिच्या प्रेग्नेंसीवरील पुस्तकाची घोषणा केली आहे. हे पुस्तक 2021 मध्ये पब्लिश होणार आहे. करीना कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून ती नव्या बाळाला पुढील वर्षी जन्म देणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement