Kangana Ranaut vs Urmila Matondkar: कंगना रनौत हिच्या 'Soft Pornstar' कमेंटनंतर उर्मिला मातोंडकर हिच्या समर्थनार्थ बॉलिवूड सेलिब्रिटींचे ट्विट
आपल्या एका मुलाखतीत कंगनाने उर्मिला वर निशाणा साधला. त्यानंतर आता बॉलिवूड सेलिब्रिटींना उर्मिलाच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे.
अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिला टार्गेट करत ती सॉफ्ट पॉर्नस्टार (Soft Pornstar) असल्याचे म्हटले. आपल्या एका मुलाखतीत कंगनाने उर्मिला वर निशाणा साधला. त्यानंतर आता बॉलिवूड सेलिब्रिटींना उर्मिलाच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. कंगना हिच्या या वादग्रस्त विधानानंतर अनेक सेलिब्रिटींनी उर्मिलाच्या अभिनयाचे, नृत्यकलेचे, सौंदर्याचे कौतुक केले आहे. स्वरा भास्कर, अनुभव सिन्हा, फराह खान अली यांनी ट्विट करत उर्मिलाला पाठींबा दर्शवला आहे.
स्वरा भास्कर हिने ट्विट करत लिहिले, प्रिय उर्मिला मातोंडकर जी, मासूम, चमत्कार, रंगीला, जुदाई, दाउद, सत्या भूत, कौन, जंगल, प्यार तूने क्या किया, तहजीब, पिंजर, एक हसीना थी... यांसारख्या तुमच्या अनेक दमदार परफॉरर्मेंसेस आठवत आहे... तुम्ही तुमचे अभिनय कौशल्य आणि नृत्यकलेला अधिकच सुंदर बनवले आहे. खूप सारे प्रेम.
फराह खान अली (Farah Khan Ali) हिने उर्मिलाचे कौतुक करत लिहिले, क्लास (दर्जा) ला लक्ष वेधून घेण्याची आणि बडबड करण्याची गरज भासत नाही. ते सदैव चमकत राहते.
दिग्दर्शक अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) याने लिहिले, फक्त इतकेच सांगू इच्छितो की, तुम्ही सर्वात सुंदर, मोहक आणि एक्सप्रेसिव्ह अभिनेत्रींपैकी एक आहात. खूप सारे प्रेम.
या सर्वांना उर्मिलाने ट्विटद्वारे धन्यवाद दिले आहेत. दरम्यान, कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार म्हणून उल्लेख केला. तसंच तिच्या अभियनामुळे तिला कोणी ओळखत नाही तर सॉफ्ट पॉर्नमुळे ओळखतात का? असेही ती म्हणाली. जर तिला निवडणूकीसाठी पक्षाचं तिकीट मिळू शकतं तर मला का नाही? असा सवालही तिने उपस्थित केला. यावर उर्मिलाने कंगनाला सडेतोड उत्तर दिले आहे.
इंडिया टुडे ला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला म्हणाली होती की, "कंगनाला दुसऱ्यांकडे बोटं दाखवण्याची गरज नाही. तिने स्वतःकडे पाहावे. संपूर्ण देश ड्रग्सच्या समस्येशी लढत आहे. तिला माहित आहे का ड्रग्सची सुरुवात हिमाचल प्रदेशातून होते. तिला आपल्याच राज्यातून सुरुवात करायला हवी. कंगनाने सर्व ड्रग्स माफियांची नावं सांगायला हवीत. तिने पुढे यावे आणि नावं सांगावी त्यासाठी मी सर्वात प्रथन तिला धन्यवाद देईन."