सुष्मिता सेन आणि बॉयफ्रेंड रोहमन अडकणार विवाहबंधनात?; हिवाळ्यात असणार मुहूर्त, जाणून घ्या इतर माहिती
मात्र सुश्मिताच्या मनावर राज्य करत आहे आहे तो तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl). गेले अनेक महिने सुश्मिता आणि रोहामान रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचे एकत्रित अनेक फोटो चाहत्यांनी पाहिले आहेत.
मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) चे सौंदर्य आजही अनेकांच्या काळजावर राज्य करत आहे. मात्र सुष्मिताच्या मनावर राज्य करत आहे आहे तो तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl). गेले अनेक महिने सुष्मिता आणि रोहमन रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांचे एकत्रित अनेक फोटो चाहत्यांनी पाहिले आहेत. यावरून दोघांमधील प्रेम किती गहिरे असेल याचा अंदाज येतो मात्र सर्वांच्याच मनात हा प्रश्न आहे की ही जोडी लग्नबंधनात कधी अडकणार? तर नुकत्याच मिळालेल्या माहितीद्वारे ही जोडी या वर्षाअखेरीस विवाहबंधनात अडकणार आहे
वोगने (Vogue) दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात सुष्मिताच्या लग्नाचा मुहूर्त निघू शकतो. सुष्मिता आणि रोहमन यांनी लग्नाच्या चर्चा करायलाही सुरुवात केली आहे. रोहमन याने याआधीच सुष्मिता प्रपोज केले आहे. त्यामुळेच लवकरच या दोघांच्या लग्नाची तारीख समोर येईल अशी अपेक्षा आहे. आता उत्सुकता आहे ते हे लग्न कुठे आणि कसे पार पडते याची. (हेही वाचा: बॉयफ्रेंडसोबत सुष्मिता सेनने अशी साजरी केली दिवाळी (Photos))
दरम्यान काही दिवसांपूर्वी रोहमन आणि सुष्मिता यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर रोहमन दोघांचा एक फोटो पोस्ट करत या बातम्यांवर पडदा टाकला होता. इंस्टाग्रामवर रोहमन आणि सुष्मिता एकमेकांना पहिल्यांदा भेटले. रोहमनने सुष्मिताला मेसेज पाठवला होता तो तिला प्रचंड आवडला, त्यानंतर हा मेसेजचा सिलसिला सुरु होत डेटिंग पर्यंत पोहचला. आता लवकरच दोघांची लग्नगाठ बांधली जाईल.