सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी कंगना रनौत पोलिसांची करणार मदत करणार, वकिलांच्या माध्यमातून दिली माहिती
ऐवढेच नाही तर कंगना हिच्या टीमने सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून असे सांगितले आहे की, तिला तिचा जबाब नोंदवायचा आहे. परंतु पोलिसांकडून यावर अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
बॉलिवूड मधील अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. सुशांतच्या आत्महत्येबाबतचा आतापर्यंत 40 पेक्षा अधिक जणांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये संजय लिला भंसाली. रुमी जाफरी, रिया चक्रवर्ती, संजना संघी, आदित्य चोपडा आणि सुशांत याच्या जवळीक नातेवाईकांचा सुद्धा समावेश आहे. याच दरम्यान, बॉलिवूड क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्वांच्या भुवया उंचावल्या जातील असे काही खुलासे सुद्धा केले आहेत. ऐवढेच नाही तर कंगना हिच्या टीमने सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून असे सांगितले आहे की, तिला तिचा जबाब नोंदवायचा आहे. परंतु पोलिसांकडून यावर अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यामुळे आता कंगना हिने तिच्या वकिलांच्या माध्यमातून सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांची मदत करणार असल्याचा दावा केला आहे.
ANI यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कंगना रनौत हिने तिच्या वकिलांच्या माध्यातून ती सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांची मदत करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या या प्रकरणी मदत करण्यासाठी ती उत्सुक असल्याचे ही तिने म्हचले आहे. पत्रात पुढे असे ही म्हटले आहे की, सध्या कंगना ही हिमाचल प्रदेशात आहे. यामुळे ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तिचा जबाब नोंदवू शकते.(Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत चा 'छिछोरे' चित्रपट पाहून छत्तीसगडमधील भिलाई येथील सातवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या)
दरम्यान, कंगनाच्या टीमने सोशल मीडियात तिची बहिण रंगोली चंडेल आणि पोलिसांच्या व्हॉट्सअॅपचा स्क्रिन शॉर्ट शेअर केला होता. त्यामध्ये रंगोली हिने कंगनाला फोन किंवा मेसेजच्या माध्यमातून पोलिसांकडे जबाब नोंदवायचा असल्याचे म्हटले होते. यावर पोलिसांनी काही उत्तर दिलेले नाही. तर पोलिसांनी असे म्हटले आहे की, अभिनेत्रीला यापुर्वी समन्स पाठवण्यात आले होते. परंतु त्यावर अद्याप तिच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.