Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत च्या निधनानंतर करण जोहर आणि आलिया भट्ट वर का भडकले नेटकरी? (See Tweets)
नेपोटीझम मुळे त्याला ही मंडळी नेहमी बाजूला करत होती, इंडस्ट्रीने त्याला स्वीकारले नाही असे ट्विटस ट्रेंड होत आहेत.
RIP Sushant Singh Rajput: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने वयाच्या 34 व्या वर्षी आत्महत्या करून चटका लावून जाणारी एग्झिट घेतली. त्याच्या निधनाची बातमी ही फॅन्ससहित समस्त बॉलिवूड साठी सुद्धा मोठा धक्का होती. सुशांतने मानसिक नैराश्यातून हे मोठे पाऊल उचलले असल्याचे म्हंटले जातेय, मात्र अद्याप त्याच्या या निर्णयामागचे खरे कारण समजलेले नाही. सुशांतच्या निधनानंतर दिगदर्शक आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना काल पासूनच नेटकऱ्यांचा रोष पत्करावा लागत आहे. जेव्हा सुशांत होता तेव्हा नेपोटीझम मुळे त्याला ही मंडळी नेहमी बाजूला करत होती, त्याला अनेक बड्या निर्मात्यांनी काम नाकारले होते, इंडस्ट्रीने त्याला स्वीकारले नाही मात्र आता जेव्हा त्याचे निधन झाले आहे तेव्हा सर्वजण खोटी आत्मीयता दाखवत आहेत असे अनेक आरोप या ट्विटस मधून करण्यात आले आहेत. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात..
सुशांतच्या मृत्यूनंतर ट्विटरवर #Karanjohar #BoycottKaranJohar #AliaBhatt #Nepotism असे अनेक हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. आतापर्यंत हे हॅशटॅग वापरून जवळपास 10 हजार ट्विट करण्यात आले आहेत. यातील काही ट्विट्समध्ये करण जोहर सारख्या अनेकांनी सुशांतला स्वीकारले नाही. तो स्टार नाही असे म्हणत त्याला नेहमी बाजूला ठेवले असे आरोप लगावले आहेत. Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना.
पहा ट्विट
करण जोहर, यशराज फिल्म्स, सलमान खान, टी सिरीज सारख्या मोठ्या निर्मात्या कंपन्यांनी सुशांत सोबत काम करायला नकार दिल्याने त्याला केवळ वेब सिरीज मध्ये काम करण्याची वेळ आली होती असेही आरोप लगावण्यात आले आहेत.
पहा ट्विट
आलिया भट्टच्या बाबत सांगायचे झाल्यास कॉफी विथ करण मध्ये एकदा रॅपिड फायर राउंडला जेव्हा आलिया ला सुशांत बाबत ऑप्शन देण्यात आला होता तेव्हा तिने सुशांत कोण आहे असा प्रश्न विचारला होता ज्यांनंतर ती आणि करण दोघांनी सुशांतबाबत अनेक कमेंट्स केल्या होत्या त्यामुळे आता त्याच्या मृत्यूनंतर आपुलकी दाखवण्याची काय गरज असे नेटकऱ्यांनी विचारले आहे.
पहा ट्विट
सुशांत सिंह ने एकदा एका फॅनच्या कमेंट ला रिप्लाय देताना आपल्याला बॉलिवूड मध्ये मिळणाऱ्या वागणुकीबद्दल अप्रत्यक्ष भाष्य केले होते.
पहा ट्विट
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या पार्थिवावर मुंबई मध्येच अंत्यसंस्कार होतील. काल रात्री सुशांतचे वडिल आणि इतर कुटुंबिय मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांनी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरातून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम झाले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल येईल आणि मृतदेह कुटुंबांच्या ताब्यात दिला जाईल.