Sushant Singh Rajput Death Inquiry: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस स्थानकात दाखल

तसेच सिनेसृष्टीसह सर्वांनाच त्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे धक्का बसला होता. सुशांत सिंह राजपूत याचे शवविच्छेदन रिपोर्टनुसार त्याने गळफास लावूनच आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती.

Rhea Chakraborty (Photo Credits-ANI)

बॉलिवूड मधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. तसेच सिनेसृष्टीसह सर्वांनाच त्याच्या या टोकाच्या निर्णयामुळे धक्का बसला होता. सुशांत सिंह राजपूत याचे शवविच्छेदन रिपोर्टनुसार त्याने गळफास लावूनच आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती. मात्र सुशांत सारख्या अभिनेत्याने आत्महत्या का केली या पाठी काही तरी कारण असावे असे बोलले जात आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात येत आहेत. त्यामुळेच आता सुशांत याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. यासाठी ती वांद्रे पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.

सुशांत सिंह याच्या आत्महत्ये प्रकरणी त्याचे मित्र-परिवारासह त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी त्याच्या वडिलांनी सुशांत याच्या आत्महत्ये प्रकरणी जबाब नोंदवला आहे. त्यानंतर आता रिया चक्रवर्ती हिची या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. सुशांत सिंह याच्या आत्महत्येच्या एक दिवस आधीच रिया आपल्या घरी परतल्याचे सांगण्यात आले होते.(Sushant Singh Rajput Death Inquiry: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या चौकशीच्या मागणीसाठी, जितेंद्र आव्हाड घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट)

पोलिसांना सुशांत सिंह राजपूत याच्या घरातून 5 डायऱ्या मिळाल्या आहेत. यावरुन पोलीस त्याच्या आयुष्याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच सुशांत याचा मॅनेजर सिद्धार्थ पिठानी याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. त्याचसोबत दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी सुशांत याचा अखेरचा चित्रपट दिल बेचारा सुद्धा अद्याप प्रदर्शित होणे बाकी असल्याचे त्यांच्या जबाबात म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif