Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिपेश सावंत याला 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी
आज त्याला न्यायालयाने 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी सुनावली आहे.
Sushant Singh Rajput Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत (Dipesh Sawant) याला शनिवारी अटक केली होती. आज त्याला न्यायालयाने 9 सप्टेंबरपर्यंत NCB कोठडी सुनावली आहे.
दिपेश सावंतचे वकिलांनी म्हटलं आहे की, दिपेश सावंत 4 सप्टेंबरपासून त्यांच्या (एनसीबी) ताब्यात होता. यासंदर्भात त्याच्या कुटुंबाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे दिपेशला 24 तासापेक्षा जास्त काळ कोठडीत ठेवल्याबद्दल याचिका दाखल केली आहे. कोर्टाने एनसीबीकडून उत्तर मागितलं असल्याचही दिपेश सावंत याच्या वकिलाने माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे. (हेही वाचा - Dia Mirza On Sanjay Raut: कंगनाला 'हरामखोर मुलगी' म्हटल्याप्रकरणी संजय राऊत यांनी माफी मागावी - दिया मिर्झा)
एनसीबीचे उपसंचालक के.पी.एस. मल्होत्रा यांनी सांगितलं आहे की, दीपेश सावंत हा ड्रग्जची खरेदी करण्यासोबत हाताळणीही करीत होता. आधी अटक केलेल्या आरोपींचे जबाब आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली आहे.
दरम्यान, शनिवारी एनसीबीने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.