Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर क्रिती सॅनन झाली भावूक; इंस्टाग्रामवर केली 'अशी' पोस्ट
सुशांतच्या आत्महत्येने सिनेमासृष्टीतील कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने 14 जूनला वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुशांतच्या आत्महत्येने सिनेमासृष्टीतील कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. यातच बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) हीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्रितीने आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram) अकाऊंटवर सुशांत सोबतचे काही फोटो शेअर केले आहे. तसेच सुशांतसाठी एक भावूक मॅसेजही तिने लिहला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर क्रितीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर न केल्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी तिच्यावर टीका केली होती.
सुशांत सिंह राजपूतचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला होता. सुरुवातीला मालिकांमधून आपल्या सुरूवात करणाऱ्या सुशांतने 2013 सालच्या काय पोछे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही निवडक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकरल्या होत्या. परंतू, गेल्या रविवारी अचानक त्याच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच त्याचे चाहते धास्तावून गेले आहेत. त्यानंतर आज क्रितीने देखील सुशांतच्या आठवणीत इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येची धक्कादायक बातमी ऐकून बिहारमधील चाहत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या - रिपोर्ट
क्रितीची इंस्टाग्राम पोस्ट-
सुश, मला माहित आहे की... तुझे मन, तुझे विचार तुझे सर्वांत चांगले मित्र आणि सर्वांत मोठा शत्रूही तेच होते. तुला जगण्यापेक्षा मरणे सोप्प वाटले, या विचाराने आज मी पूर्णपणे कोसळले आहे. त्या क्षणी तुझ्या आजूबाजूला काही जण हवे होते. जे त्या क्षणी तुला यातून बाहेर काढू शकले असते. ज्यामुळे तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांना तू हा धक्का दिला नसता. तुझ्या मनातली घालमेल मला समजून घेता आली असती.आता हे शक्य नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. माझ्या काळजाचा एक तुकडा तुझ्या सोबत आहे. आणि तू नेहमीच माझ्यासोबत राहणार आहेस. नेहमीच तुझ्यासाठी प्रार्थना करत होते आणि यापुढेही करेल असे क्रितीने लिहिले आहे.
‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होत.