Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती संपर्कात नसून तिने पळ काढला तरीही पुढे येत नाही- बिहार डीजीपी गुप्तेश्वर पांडे
आतापर्यंत 30 हून अधिक जणांनी आपला जबाब नोंदवला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी रिया ही परिवारासोबत मोठ्या बॅग्स भरुन कुठेतरी निघुन गेल्याची माहिती समोर आली होती.
सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर प्रत्येक दिवस या प्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे. आतापर्यंत 30 हून अधिक जणांनी आपला जबाब नोंदवला आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी रिया ही परिवारासोबत मोठ्या बॅग्स भरुन कुठेतरी निघुन गेल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांसह बिहार पोलीस सुद्धा तपास करत आहेत. याच दरम्यान बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर यांनी असे म्हटले आहे की, रिया चक्रवर्ती ही आमच्या संपर्कात नाही. तसेच तिने पळ काढला तरीही ती पुढे नेत आहेत. ऐवढेच नव्हे तर मुंबई पोलिसांच्या संपर्कात ती आहे की नाही याची सुद्धा माहिती आमच्याकडे नाही.
तसेच पुढे गुप्तेश्वर पांडे यांनी असे ही म्हटले आहे की, आयपीएस ऑफिसर विनय तिवारी यांना क्वारंटाईनपासून मुक्त करावे अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यांना परत पाठवावे असे ही महापालिकेला म्हटले आहे. हे प्रोफेशन पद्धतीचे वागणे नव्हे. आमच्या ऑफिसरला अशा पद्धतीने ठेवले आहे की जसे त्यांना अटक करण्यात आली आहे.(Sushant Singh Rajput Death Probe: सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली)
दुसऱ्या बाजूला मुंबईचे डीसीपी परमजित एस धानिया यांनी असे म्हटले आहे की, सुशांतच्या वडिलांना आम्ही लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे. त्यांना मिरांडा नावाच्या व्यक्तीला पोलीस कोठडीत ठेवण्यात यावे असे वाटत होते. परंतु कोणतीही लेखी तक्रार आमच्याकडे आलेली नाही.(Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण 'सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार दिली नव्हती')
दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याबाबत समीत ठक्कर यांनी त्यांचे वकील रसपालसिंह रेणू यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, मुबंईत सोमवारी रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.