Sushant Singh Rajput case: कंगना रौनौत हिला समन्स, महेश भट्ट, करण जौहर यांच्या मॅनेजर्सची होणार चौकशी- अनिल देशमुख
मुंबई पोलीस त्याच्या आत्महत्येचे गूढ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तपास सुरु आहे. पोलिसांकडून सातत्याने तपास सुरु आहे. अनेक लोकांची चौकशी आणि जबाब नोंदवले गेले आहेत
अभिनेता सुशांत सिंह रजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत 37 जणांचे जवाब नोंदविण्यात आले आहेत. आणखीही काही जणांचे जबाब नोंदविण्यात येतील. कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला समन्स पाठविण्यात आले आहे. तिचा जबाब नोंदविण्यात येईल. याशिवाय 'महेश भट्ट (Mahesh Bhatt), करण जौहर ( Karan Johar) यांच्या मॅनेजर्सची होईल. गरज पडल्यास करण जोहर आणि महेश भट्ट यांचेही जबाब नोंदवण्यात येतील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येला आता जवळपास महिना पूर्ण झाला. मुंबई पोलीस त्याच्या आत्महत्येचे गूढ शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तपास सुरु आहे. पोलिसांकडून सातत्याने तपास सुरु आहे. अनेक लोकांची चौकशी आणि जबाब नोंदवले गेले आहेत. 14 जूनच्या दूपारी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याचे वृत्त आले आणि एकच खळबळ उडाली. वांद्रे येथील एका फ्लॅटमध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थे सुशांतचा मृतदेह आढळून आला. (हेही वाचा, सुशांत सिंह राजपूत याचा 'दिल बेचारा' सिनेमा IMDb रॅंकिंगवर अव्वल; प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद (View Tweets))
दरम्यान, वकील ईशकरण भंडारी यांनी म्हटले आहे की, सीबीआयद्वारे चौकशी होत नाही तोपर्यंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या एक गूढ म्हणायला हवे.