लॉकडाऊन काळात सनी लियोनी ने पती आणि मुलांसोबत बनवली खास पेंटिंग; पहा व्हिडिओ
लॉकडाऊन काळात अनेक कलाकार घरात वेगवेगळे प्रयोग करून त्याचा व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. अशातचं आता अभिनेत्री सनी लियोनीने (Sunny Leone) आपल्या कुटुंबासोबत एक खास पेंटिंग तयार केली आहे. ही पेंटिंग बनवतानाचा व्हिडिओ सनी लियोनीने शेअर केला आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात 3 में पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात अनेक कलाकार घरात वेगवेगळे प्रयोग करून त्याचा व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. अशातचं आता अभिनेत्री सनी लियोनीने (Sunny Leone) आपल्या कुटुंबासोबत एक खास पेंटिंग तयार केली आहे. ही पेंटिंग बनवतानाचा व्हिडिओ सनी लियोनीने शेअर केला आहे.
सध्या सनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. लॉकडाऊन काळात आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सनी आपले काही फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असते. सनीने आपला पती आणि मुलांसोबत एक खास पेंटिंग तयार केली आहे. ही पेंटिंग बनवताचा व्हिडिओ सनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंट्स दिल्या आहेत. (हेही वाचा - Maharashtra Din 2020 Special: 'बघतोस काय मुजरा कर' म्हणत सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, शशांक केतकर सह मराठी कलाकारांच्या जनतेला 60 व्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!)
या व्हिडिओमध्ये सनीसोबत तिचा पती आणि तीन मुलं दिसत आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना सनीने सांगितलंय की, ही पेंटिंग बनवताना मला पती आणि मुलांनी मदत केली आहे. ही पेंटिंग पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला ती पुन्हा दाखवेल.