सनी लियोन हिने Coronavirus चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आपल्या कुटूंबासोबत उचचले हे पाऊल, फोटो शेअर करुन आपल्या मुलांबाबत व्यक्त केली काळजी

हा फोटो शेअर करुन सनीने लोकांना सामाजिक संदेश दिला आहे.

Sunny Leone Mask (Photo Credits: Instagram)

नेहमी आपल्या हॉट आणि सेक्सी लूक्स मुळे चर्चेत असलेली सनी लियोन (Sunny Leone) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कोरोना व्हायरसमुळे केवळ सामान्य नागरिक नाही तर रुपेरी पडद्यावरील सिने स्टार्सही घाबरले आहेत. त्यासाठी Coronavirus चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने खबरदारी घेत आहे. यात सनी लियोन हिने देखील दक्ष नागरिकाची भूमिका बजावत एक महत्त्वाचे पाऊल उचचले आहे. यात तिने आपल्या 3 मुलांसह आपल्या पतीला देखील सहभागी केले आहे.

या फोटोमध्ये सनी लियोन आणि तिचा पती डॅनियल (Daniel Weber) याने आपल्या 3 मुलांसह मास्क लावलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करुन सनीने लोकांना सामाजिक संदेश दिला आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A new era! So sad that my kids have to now live like this but it’s necessary. Training toddlers to wear a mask Day 1... @dirrty99 and Nathalina team family effort!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

हेदेखील वाचा- Sunny Leone चा याआधी कधीही पाहिला नाही असा काळ्या गाऊनमधील हॉट बॅकलेस फोटो

त्यासोबतच तिने माझ्या मुलांना एवढ्या लहान वयात असे मास्क लावावे लागत आहे याबद्दल मला दु:ख वाटत आहे असे कॅप्शन दिले आहे. मात्र आपल्या कुटूंबाच्या सुरक्षेसाठी असे करणे गरजेचे आहे असेही ती पुढे म्हणाली.

नुकताच तिने काळ्या गाऊनमधील एक हॉट फोटो शेअर केला आहे. यात ती खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. तसेच या तिचा कमनीय बांधा पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. याआधीही तिने आपले अनेक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र या फोटोमधील तिचा बोल्ड अंदाज सर्वांच्याच नजारा वळवून घेत आहे.