सनी लियोनी आणि डेनियल वेबर (Image Credit: Instagram)

Sunny Leone Video: बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) सध्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकामध्ये (America) राहत आहे. सनी नेहमी आपल्या दैनंदिन जीवनातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सनी लियोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पति डेनियल (Daniel Weber) सोबतचे काही खास क्षण कैद केलेले व्हिडिओ शेअर केले आहेत.

सनी या व्हिडिओमध्ये पती डेनियलची मालिश करताना दिसत आहे. सनी आणि डेनियलचा हा व्हिडिओ खूपचं क्यूट आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही सनी आणि डेनियलच्या केमिस्ट्रीचा फॅन झाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये सनी ऑक्टोपस हेड मसाजच्या साहाय्याने डेनियलची मालिश करत आहे. डेनियलची मालिश करताना सनी एन्जॉय करताना दिसत आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्ये सारं काही बंद असल्याने वैतागलेल्या 4 वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव (Watch Video))

 

View this post on Instagram

 

Who has used this Head massager? Whoever invented this device is a genius 😋 Tag that friend who loves using this!! #SunnyLeone

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषीत केल्यानंतर सनी आपल्या कुटुंबासमवेत मुंबईमध्ये होती. परंतु, त्यानंतर काही दिवसातचं ती अमेरिकेला गेली. सध्या भारतापेक्षा अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. परंतु, तरीदेखील सनीने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सनी अमरिकेमध्ये राहत असली तरी ती आपल्या दैनंदिन जीवनातील विविध क्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.