Sunny Leone Birthday Special: बेबी डॉल ते कुठं कुठं जायचं हनिमूनला सहित 'या' गाण्यांमध्ये सनी लियोनी च्या अदा पाहून प्रेक्षक झाले होते फिदा (Watch Video)
सनी ने आतापर्यंत बॉलिवूड मध्ये अनेक गाणी आपल्या डान्सने गाजवली आहेत, अगदी अलीकडे तिने कुठं कुठं जायाचं हनिमूनला या गाण्यावर मराठी चित्रपटात सुद्धा आपली जादू दाखवून दिली होती. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या काही होत गाण्यांची झलक आपण पाहुयात..
Sunny Leone Birthday: बॉलिवुडची बेबी डॉल सनी लियोनी (Sunny Leone) हीच आज 39 वा वाढदिवस आहे, सनीचा जन्म 13 मे 1981 रोजी झाला होता, पंजाबी कुटुंबात जन्म, करनजीत कौर म्हणुन जीवन ते पॉर्न इंडस्ट्री तिथून लग्न, बॉलिवूड मध्ये एंट्री, अनाथ मुलीला दत्तक घेणं अशी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी तिची कहाणी आहे. सनी 19 वर्षाची असताना एका जर्मन बेकरी मध्ये ती काम करत होती यानंतर तिने पॉर्न फिल्म (Porn Film) मध्ये काम करायला सुरुवात केली. बॉलिवूड मध्ये अर्थातच तिला लगेच मान्यता मिळाली नाही पण मग अभिनेत्री म्हणून नाही तर आयटम नंबर्स करून तिने बरीच प्रसिद्धी मिळवली. सनी ने आतापर्यंत बॉलिवूड मध्ये अनेक गाणी आपल्या डान्सने गाजवली आहेत, अगदी अलीकडे तिने कुठं कुठं जायाचं हनिमूनला या गाण्यावर मराठी चित्रपटात सुद्धा आपली जादू दाखवून दिली होती. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या काही होत गाण्यांची झलक आपण पाहुयात..
बेबी डॉल
कुठं कुठं जायचं हनिमूनला
पानी वाला डान्स
मेरे सैय्या सुपरस्टार
लैला मै लैला
पिंक लिप्स
दरम्यान लॉक डाऊन काळात घरातच अडकून पडलेली सनी आपला पती डेनियल वेबर आणि मुलांसोबत आपला बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. तसेच सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देणाऱ्या फॅन्ससाठी सुद्धा तिने एक स्पेशल मॅसेज पाठवून आभार मानले आहेत.
Sunny Leone Birthday Special : सनी लिओनी बद्दल अशा गोष्टी ज्या तुम्हाला आतापर्यंत माहित नाहीत - Watch Video
अनेकदा पॉर्न क्षेत्रात गेलेल्या व्यक्तीला तिथून बाहेर पडणे शक्य होत नाही किंवा बाहेर येऊनही समाजात त्यांना स्वीकारले जात नाही, मात्र सनीने अगदी कमालीने पॉर्न सोडूनही आपली ओळख बनवली आहे. आज तिच्या या खास दिवशी लेटेस्टली कडूनही Happy Birthday Sunny!
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2020 10:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

