Radhe Shyam Movie: दाक्षिणात्या सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे चा ‘राधे श्याम’ चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित; पहा रोमँटिक फोटोज
पूजा हेगडेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटातील रोमँटिक फोटोज शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर पूजा हेगडे आणि प्रभासचा हा रोमँटिक लूक प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या फोटोला लाईक तसेच कमेंन्टस केल्या आहेत.
Radhe Shyam Movie: दाक्षिणात्या सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) चा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. पूजा हेगडेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटातील रोमँटिक फोटोज शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर पूजा हेगडे आणि प्रभासचा हा रोमँटिक लूक प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या फोटोला लाईक तसेच कमेंन्टस केल्या आहेत.
पूजा हेगडेने शेअर केलेल्या फर्स्ट लूकमध्ये दोघेही रोमँटिंक अंदाजात दिसत आहे. विशेष म्हणजे प्रभासनेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘राधे श्याम’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना प्रभासने म्हटलं आहे की, ‘माझ्या चाहत्यांसाठी हे खास गिफ्ट आहे. मला आशा आहे की, तुम्हाला हे नक्की आवडेल.’ पूजाने सोशल मीडियावर राधे श्याम चित्रपटाचे पोस्टर शेअर केल्यानंतर ट्विटरवर #Poojahegde हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. (हेही वाचा - Vikas Dubey Encounter: विकास दुबे याची भुमिका साकारणार अभिनेता मनोज वाजपेयी? कानपूर एन्काउंटर नंतर बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण)
‘राधे श्याम’ चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजने केली असून राधा कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चाहत्यांना उत्सुकता लागलेला हा रोमँटिक चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा तेलुगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम अशा 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भाग्यश्री, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, मुरली शर्मा, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आदी कलाकरांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्रभासने या चित्रपटाची घोषणा केली होती, तेव्हा ट्विटरवर #Prabhas20 असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.