Tamannaah Bhatia Tests Positive For COVID-19: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ला कोरोना विषाणूची लागण; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

बॉलिवूड तथा दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ला कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. या बातमीनंतर तमन्नाचे चाहते तिची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

Tamannaah Bhatia Tests Positive For COVID-19: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ला कोरोना विषाणूची लागण; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Tamannaah Bhatia (Photo Credit - Twitter)

Tamannaah Bhatia Tests Positive For COVID-19: देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आतपर्यंत लाखो नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यात अनेक दिग्गज नेत्यांचा तसेच कलाकारांचा समावेश आहे. यातील अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र, अशाचं आता बॉलिवूड तथा दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ला कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. या बातमीनंतर तमन्नाचे चाहते तिची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, तमन्ना गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये एका वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यक्त होती. मात्र, काही दिवसांपूर्वी तपन्नाला ताप आला होता. तसेच तिच्यामध्ये कोरोनाची काही सौम्य लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे तिने आपली कोरोना चाचणी करून घेतली. यात तमन्नाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तमन्नाला पुढील उपचारासाठी तातडीने हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा - Sanjay Dutt Health Update: संजय दत्त याच्यासोबत चाहत्याने काढलेला सेल्फी व्हायरल, अभिनेत्याचा लूक पाहून व्हाल हैराण)

दरम्यान, ऑगस्टमध्ये तमन्नाच्या पालकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी तमन्नाचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, तेव्हा तिचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तमन्नाने यासंदर्भात आपल्या सोशल मीडियावरून माहिती दिली होती. यात तमन्नाने म्हटलं होत की, 'माझ्या आईवडीलांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. दुर्दैवाने माझ्या पालकांनी कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. आम्ही सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आहोत,' असं तमन्नाने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

देशात आतापर्यंत 65 लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय 10 हजारहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 55 लाखाहून अधिक नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2020 07:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).