Mission Manju: सिद्धार्थ मल्होत्रा च्या 'मिशन मंजू' या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
या चित्रपटाची कथा 1970 च्या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर आधारित असणार आहे.
Mission Manju: सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) ने अलीकडेच आपल्या 'मिशन मंजू' (Mission Manju) या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात ती सिद्धार्थ मल्होत्राच्या सोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा रॉ एजंटची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. या चित्रपटाची कथा 1970 च्या दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर आधारित असेल.
दरम्यान, रश्मिका मंदानाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या ट्विटमध्ये रश्मिकाने म्हटलं आहे की, 'मित्रांनो, तुमच्यासाठी चांगली बातमी आहे! या चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप आनंदित आणि उत्साहित आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मी नवीन प्रवास सुरू करत आहे. हा चित्रपट खर्या घटनेवर आधारित आहे. ही पाकिस्तानमधील भारतातील सर्वात साहसी रॉ मिशनची कहाणी आहे.' (हेही वाचा - Sussanne Khan ने पार्टी मधील अटकेसंदर्भातील वृत्त फेटाळलं; सोशल मीडियावर शेअर केलं संपूर्ण स्टेटमेंट)
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा जबरदस्त लुक तयार करण्यात आला आहे. या सिद्धार्थ जणू हातात बंदूक घेऊन रणांगणातून येत असल्याचा भास होत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याची स्टाईल पाहायला मिळत आहे. सिद्धार्थचा हा लूक 70 च्या दशकातील आहे. परंतु, अद्याप रश्मिका मंदानाच्या भूमिकेविषयी माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाची कथा परवेझ शेख आणि असीम अरोरा यांनी लिहिली आहे.