Devara OTT Release Date: साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपट 'देवरा: पार्ट वन' लवकरचं ओटीटीवर प्रदर्शित होणार; जाणून घ्या तारीख
आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर देवरा 8 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत.
Devara OTT Release Date: साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Junior NTR) स्टारर चित्रपट 'देवरा: पार्ट वन' (Devra Part One) ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील दिसले होते. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर देवरा 8 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकत घेतले आहेत.
देवरा चित्रपटात साऊथ आणि बॉलिवूड स्टार्सना कास्ट करण्यात आले होते. हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये नेण्याचाही त्यामागचा उद्देश होता. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला. या चित्रपटाचे जगभरात 300 कोटींहून अधिक कलेक्शन होते. (हेही वाचा -Devara Worldwide Box Office Collection Day 2: ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'चा जगभरातील बॉक्स ऑफिसवर धमाका, 2 दिवसांत 243 कोटींचा व्यवसाय)
देवरा चित्रपट ओटीटीवर 'या' दिवशी होणार प्रदर्शित -
आता देवरा हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. 8 नोव्हेंबरनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. ज्युनियर एनटीआर सोबत या चित्रपटात बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. आता साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाला आहे. दक्षिणेत अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या ज्युनियर एनटीआरचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असेल. (हेही वाचा -Devara Part 1 Box Office Collection Day 10: 'देवरा पार्ट 1' लवकरच थलपथी विजयच्या GOAT चा रेकॉर्ड मोडणार? आतापर्यंतची एकूण कमाई घ्या जाणून)
दरम्यान, एनटीआर आगामी 'वॉर-2' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या वॉरचा सिक्वेल असेल. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत रितीक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.