Sonu Sood च्या नावाने फसवणूक करणाऱ्याला अटक; अभिनेत्याने फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सतर्कतेचा इशारा
तर त्याच्या या कामाला हातभार न लावता त्याच्या नावाने फसवणूक देखील केली जात आहे.
मागील वर्षी कोविड-19 लॉकडाऊनच्या (Covid-19 Lockdown) काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ने गरीब-गरजूंची मोठी मदत केली. स्थलांतरीत मजूरांना स्वगृही पोहचवण्यासाठी देखील सोनू ने पुढाकार घेतला. लॉकडाऊनंतरही त्याने मदतकार्य सुरुच ठेवले. त्याच्या सामाजिक कार्याचे देशभरात कौतुक झाले. मात्र सोनू सूदच्या या मदतकार्यावर शंका उपस्थित करत काहींनी जोरदार टीकाही केली. तर त्याच्या या कामाला हातभार न लावता त्याच्या नावाने फसवणूक देखील केली जात आहे.
दरम्यान, सोनू सूदच्या नावाने फसवणूक करणारा असाच एक व्यक्ती पोलिसांनी अटक केली आहे. त्याने सोनू सूदच्या संस्थेच्या एका बँक खात्यातून पैशांची अफारा तरफ केली आहे. चंदन पांडेय असे या आरोपीचे नाव असून त्याने सोनूच्या बँक खात्यातून अवैधरीत्या 60 हजार रुपये काढल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कोणाच्यातरी सांगण्यावरुन त्याने असे केले असून यातून त्याला काही कमीशन मिळणार होते, असे त्याने चौकशी दरम्यान सांगितले. (Sonu Sood देशात 1 लाख बेरोजगारांना देणार नोकरी; GoodWorker App च्या मदतीने असा करा अर्ज)
Sonu Sood Tweet:
फसवणूक करणाऱ्या या आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सोनू सूद ने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. या पोस्टद्वारे त्याने पोलिसांचे आभारही मानले आहेत. सोनूने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "लोकांना धोका देणाऱ्या या आरोपींना पकडल्याबद्दल धन्यवाद सायबर पोलिस, तेलंगणा कमिश्नर." फसवणूक करणाऱ्यांनी आपले काम थांबवावे अन्यथा ते तुरुंगात असतील. गरीबांना धोका देणे बंद करा." दरम्यान, या प्रकारात इतर अनेकांचाही सहभाग असून पोलिस त्यांना देखील पकडण्याच्या प्रयत्नात आहेत.