Cyclone Nisarga: अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत; निसर्ग चक्रीवादाळामुळे प्रभावित झालेल्या 28 हजार लोकांना केली मदत

निसर्ग चक्रीवादामुळे (Cyclone Nisarga) प्रभावित झालेल्या 28 हजार लोकांना त्याने मदत केली आहे.

Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या सोनू सूद (Sonu Sood)  याने आणखी एक कामगिरी बजावली आहे. निसर्ग चक्रीवादामुळे (Cyclone Nisarga) प्रभावित झालेल्या 28 हजार लोकांना त्याने मदत केली आहे. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा आला आहे. सोनू सूदने 4 जून रोजी निसर्ग चक्रीवादाळामुळे प्रभावित झालेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच त्यांना अन्न-पाणी देखील पुरवले आहे. याच्या या कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचे कौतूक होत आहे. त्याने याआधीही लॉकडाउनच्या काळात शहरात अकडलेले स्थलांतरित मजुरांना आपपल्या घरी पोहचवण्याची सोय केली होती. या कारणामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील त्याची भेट घेतली होती.

प्रत्येकजण आज या कठीण परिस्थितीचा समाना करत आहेत. या भयंकर परिस्थितीत सर्वांनी एकमेकांना साथ देणेचच योग्य आहे. यामुळे मी आणि माझ्या सहकाऱ्यांने समुद्र किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या 28 हजार नागरिकांना जेवण वाटप केले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे जवळच्या शाळेत आणि महाविद्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. आत ते सुरक्षित आहेत, असा सोनू सूद म्हणाला आहे. याआधी सोनू सूदने काही दिवसांपूर्वी कर्नाटक उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या प्रवासी मजूरांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली आहे. हे देखील वाचा- अभिनेता सुमित व्यास झाला बाबा! पत्नी एकता कौल ने दिला गोंडस मुलाला जन्म

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. यांच्या या कामगिरीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूक केले जात आहे. यातच कोरोना विषाणूच्या लढ्यात अनेक मोठे व्यवसायिक, राजकीय नेते, बॉलिवूड कलाकारांसह सर्वसामान्यदेखील आर्थिक हातभार लावत आहेत.