गायिका नेहा कक्कड़ ची युट्युबवर कमाल; जगभरात सर्च केलेल्या गायिकांच्या यादीत दुसर्या स्थानी
आता नेहा कक्कड ही गायिका युट्युब वर सर्च केली जाणारी दुसर्या क्रमाकांची गायिका ठरली आहे. तर पहिल्या स्थानी अमेरिकन रॅपर कार्डी बी आहे.
गायिका नेहा कक्कड (Neha Kakkar) च्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. तिचा दमदार आवाज तिची ओळख आहे. त्यामुळे तिच्या गाण्यांची जगभरात धूम आहे. अशामध्ये आता नेहाने तिच्या नावावर एक शानदार रेकॉर्ड केला आहे. दरम्यान जगभरातील लोकप्रिय गायकांना मागे सारून भारतीयांना गर्व वाटेल असा हा एक रेकॉर्ड आता नेहा कक्कडच्या नावावर झाला आहे. आता नेहा कक्कड ही गायिका युट्युब वर सर्च केली जाणारी दुसर्या क्रमाकांची गायिका ठरली आहे. तर पहिल्या स्थानी अमेरिकन रॅपर कार्डी बी आहे.
नेहा कक्कड ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये 2019 या वर्षामध्ये युट्युबवर सर्च केलेल्यांच्या गायिकांचा यादीमध्ये समावेश आहे. यात भारतीय गायिका नेहा कक्कड 2 र्या स्थानी आहे. नेहाला 4.5 बिलियन लोकांनी युट्युबवर सर्च केलं आहे. तर कार्डी बी ला 4.8 बिलियन लोकांनी सर्च केलं आहे.
नेहा कक्कडची इंस्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
Can’t be more thankful!!!! ♥️🙌🏼🥺 Jai Mata Di 🙏🏼 Aapki Nehu 🥰 #NehaKakkar . @youtube @youtubeindia
A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on
युट्युबवर सर्च करण्यात आलेल्या गायिकांमध्ये अनेक आघाडीच्या गायिकांचा समावेश आहे. पण युजर्सकडून नेहाला सर्च करण्याचं प्रमाण अधिक आहे. नेहा कक्कडने Karol G, Blackpink, Ariana Grande, Marilia Mendonca अशा लोकप्रिय गायिकांना मागे टाकलं आहे. नेहा कक्कडच्या करियरची सुरूवात इंडियन आयडल 6 या सिंगिंग रिएलिटी शोच्या स्पर्धकापासून झाली. त्यावेळी नेहा हा शो जिंकू शकली नाही मात्र आता याच शोच्या परिक्षकांमध्ये नेहाचा समावेश आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)