हिमेश रेशमिया याच्या कारचा अपघात; ड्रायव्हरची प्रकृती गंभीर
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर हा अपघात झाला असून यात हिमेशचा ड्रायव्हर रंजन या गंभीर दुखापत झाली आहे.
गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याच्या कारचा आज सकाळी अपघात झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर हा अपघात झाला असून यात हिमेशचा ड्रायव्हर रंजन याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात हिमेश रेशमिया पूर्णपणे सुखरुप आहेत. या प्रकरणाची अधिक तपासणी सुरु आहे.
सध्या हिमेश रेशमिया 'सुपरस्टार सिंगर' या रियालिटी शो चे परिक्षण करत असून यापूर्वी त्याने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’, ‘द व्हॉइस ऑफ इंडिया किड्स’ या रियालिटी शोजचे जजिंग केले होते.
'आशिक बनाया आपने', 'झलक दिखला जा', 'नाम है तेरा', 'तेरा सुरुर' आणि 'आप की कशिश' ही हिमेशची गाजलेली गाणी असून हिमेशने काही सिनेमात आपल्या अभिनयाची चुणूकही दाखवली आहे.