Simmba Box Office Collection Day 3: Ranveer Singh-Sara Ali Khan च्या 'सिम्बा'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

रोहित शेट्टीचा बहुचर्चित सिनेमा 'सिम्बा'चा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला आहे.

सिम्बा सिनेमातील गोलमाल गँग (Photo Credits: Reliance Entertainment)

Simmba Box Office Collection Day 3: रोहित शेट्टी (Rohit Shetty) चा बहुचर्चित सिनेमा 'सिम्बा'चा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला आहे. या सिनेमात रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षकांनी देखील या जोडीला भरभरुन प्रेम दिले. 28 डिसेंबरला 'सिम्बा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे. रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी चा Simmba 'पैसा वसूल' सिनेमा!

ट्रेंड एनालिस्ट तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या दिवशी सिनेमाने चक्क 75.11 कोटींचा गल्ला केला आहे. विकेंड, इअर इंडचा सिनेमाला चांगलाच फायदा झाला आहे. शुक्रवारी 20.72 कोटी असलेली कमाई शनिवारी 23.33 कोटी इतकी झाली तर रविवारी हा आकडा 31.06 इतका झाला. म्हणजे आतापर्यंत सिनेमाने एकूण 75.11 कोटींची कमाई केली आहे. पाहा: Simmba Song Aankh Marey

सिनेमाच्या ट्रेलरने सिनेमाची भव्यता दाखवून दिली. रोहित शेट्टीचा सिनेमा म्हणजे अॅक्शनसोबत कॉमेडी, ड्रामा, रोमान्स असणार यात वादच नाही. इतकं पुरेसं नाही म्हणून की काय सिनेमातील सारा अली खान-रणवीर सिंग या जोडीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्यानंतर आलेल्या सिनेमातील हटके गाण्यांनी सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली. तसंच सिनेमाचं केलेलं जबरदस्त प्रमोशनचा ही सिनेमाच्या यशात मोलाचा वाटा आहे.