Siddhaanth Vir Surryavanshi Death: सिद्धांत सुर्यवंशीच्या निधनाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर शोककळा; हृदयविकाराच्या झटक्याने 'या' स्टार्सचा गेला जीव

सिद्धांत वीर सूर्यवंशीपूर्वी असे अनेक लोकप्रिय स्टार्स आहेत, ज्यांना हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला. ज्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने संपूर्ण इंडस्ट्री हादरली.

Siddhant Veer Suryavanshi, Raju Srivastava, Krishnakumar Kunnath (PC- Instagram)

Siddhaanth Vir Surryavanshi Death: 'कसौटी जिंदगी की' आणि 'कट्टी बट्टी' यांसारख्या शोमध्ये दिसणारे प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhant Veer Suryavanshi) यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला आणि शुक्रवारी संध्याकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याचा मृत्यू झाला. सिद्धांत यांच्या निधनाची बातमी ऐकून टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. सर्वजण अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत. सिद्धांत वीर सूर्यवंशीपूर्वी असे अनेक लोकप्रिय स्टार्स आहेत, ज्यांना हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागला. ज्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने संपूर्ण इंडस्ट्री हादरली.

राजू श्रीवास्तव -

भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 58 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये ट्रेडमिलवर कसरत करत असताना अभिनेता आणि कॉमेडियनला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव यांच्यावर एम्समध्ये सुमारे 40-41 दिवस उपचार सुरू होते. रुग्णालयात दिवसेंदिवस अभिनेत्याची प्रकृती अधिकच नाजूक होत गेली. कॉमेडियनने 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (हेही वाचा - Siddhaanth Vir Surryavanshi Passed Away: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धान्त वीर सुर्यवंशी याच निधन; जिममध्ये वर्कआऊट करताना पडला बेशुद्ध)

कृष्णकुमार कुननाथ -

दिल इबादत, आंखे में तेरी, मेरी मां अशा अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज देणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचेही वयाच्या 53 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खरं तर, 31 मे रोजी कोलकाता येथे एका संगीत कार्यक्रमादरम्यान, गायकाला अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. परंतु मध्येच या अभिनेत्याचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर आर माधवन, इमरान हाश्मी, बादशाह यांच्यासह अनेक स्टार्सनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पुनीत राजकुमार -

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाने आजही त्यांचे चाहते बाहेर पडू शकलेले नाहीत. पुनीत राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर 2021 रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्याच्या दोन चाहत्यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

सिद्धार्थ शुक्ला -

पुनीत राजकुमारप्रमाणेच सिद्धांत शुक्लाच्या आठवणी आजही चाहत्यांचे डोळे ओलावतात. बिग बॉस 13 मध्ये आपल्या खऱ्या व्यक्तिरेखेने लाखो लोकांना वेड लावणाऱ्या सिद्धार्थ शुक्ला यांचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थला घरी अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहनाज गिल पूर्णपणे तुटून गेली.

राजीव कपूर -

राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांनाही गेल्या वर्षी 9 फेब्रुवारी 2021 रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी राजीव कपूर यांना मृत घोषित केले.

विवेक -

पुनीत राजकुमार प्रमाणेच, तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते विवेक यांचे 17 एप्रिल 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विवेक हा केवळ अभिनेताच नव्हता तर तो एक उत्तम कॉमेडियन देखील होता. 59 वर्षीय अभिनेत्याला 2009 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

याशिवाय टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री, टेलिव्हिजन अभिनेता अमित मिस्त्री, भाबी जी घर पर हैंचे दीपेश भान, राज कौशल, प्रवीण कुमार सोबती अशा अनेक स्टार्सनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे या जगाचा कायमचा निरोप घेतला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now