Shweta Tiwari Official Statement: श्वेता तिवारीला समजली तिची चूक, केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण
यावर दिवसभरानंतर श्वेता तिवारीने आपली चुक मान्य करत या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने केलेल्या वक्तव्यावरून सध्या वादात आहे. 'देव माझ्या 'ब्रा'चा आकार घेत आहे, श्वेताच्या या वक्तव्यावर तिच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. भोपाळच्या (Bhopal) श्यामला हिल्स पोलिस स्टेशनमध्ये श्वेता तिवारी विरुद्ध आयपीसी कलम 295 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा वक्तव्याद्वारे धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप अभिनेत्रीवर करण्यात आला आहे. यावर दिवसभरानंतर श्वेता तिवारीने आपली चुक मान्य करत या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. मीडियाला दिलेल्या निवेदनात श्वेताने लिहिले की, 'माझ्या लक्षात आले आहे की माझ्या काही शब्दांचा माझ्या एका सहकाऱ्याने गैरसमज करून घेतला आहे. माझ्या विधानाचा संदर्भ समजला असता, सौरभ राज जैन यांना देवतेच्या लोकप्रिय भूमिकेच्या संदर्भात ठेवत मी देवाच्या संदर्भात म्हणाले होते. लोक पात्रांची नावे अभिनेत्यांशी जोडतात आणि म्हणून मी माझा संवाद माध्यामांशी साधला आणि हे उदाहरण दिले.
श्वेताने मागीतली माफी
श्वेता तिवारी पुढे म्हणाली, 'तथापि, याचा पूर्णपणे गैरसमज झाला आहे, जे अत्यंत दुःखद आहे. माझी स्वतः देवावर इतकी श्रद्धा आहे, लोकांच्या भावना दुखावतील असे काही बोलण्याचा मी विचारही करू शकत नाही. कृपया निश्चिंत रहा, शब्द किंवा कृतीने कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. त्यामुळे माझ्या केलेल्या वक्तव्यामुळे चुकुन अनेकांचे मन दुखावले गेले आहे त्याबद्दल मी नम्रपणे माफी मागू इच्छितो.' (हे ही वाचा अभिनेत्री Shweta Tiwari च्या 'ब्रा साईज' च्या वक्तव्यावरून नवा वाद; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
वास्तविक, हा सगळा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या भोपाळच्या लॉन्च इव्हेंटमध्ये स्टारकास्टसोबत पोहोचली. इथे ती गंमतीने मीडियासमोर म्हणाली, "देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे". मग काय ते पाहता या विधानावरुन गदारोळ झाला. श्वेताच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु झाली, मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ.नरोत्तम मिश्रा यांनी श्वेताच्या वक्तव्याचा निषेध केला. यासोबतच श्वेतावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.