Rhea Chakraborty हिच्या अटकेनंतर सुशांत सिंह राजपूत ची बहिण श्वेता सिंह किर्ति ने सोशल मिडियावर दिली 'ही' प्रतिक्रिया
त्या इतक्या दिवसांच्या तपासानंतर रियाला अटक झाल्याचे कळताच सुशांतची बहिण श्वेता ने 'देव आपल्यासोबत आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी NCB कडून सलग 3 दिवस चौकशी सुरु असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला आज NCB कडून अटक करण्यात आली. तिच्या अटकेच्या बातमीने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या प्र्करणाला आता वेगळच वळण लागले आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरु असताना समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणासंबंधी रियाला ही अटक करण्यात आली आहे. ही बातमी वा-यासारखी पसरली असून ही बातमी ऐकताच सुशांत सिंह राजपूत याची बहिण श्वेता सिंह किर्ति हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर यावर एका शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकरणाने एक वेगळच वळण घेतलं होते. त्या इतक्या दिवसांच्या तपासानंतर रियाला अटक झाल्याचे कळताच सुशांतची बहिण श्वेता ने 'देव आपल्यासोबत आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे. Rhea Chakraborty Arrested by NCB: रिया चक्रवर्ती हिला NCB ने केली अटक, ड्रग्ज प्रकरणाबाबत केली जाणार चौकशी
सलग 3 दिवस NCB कडून चौकशी केल्यानंतर तिला आज अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज तिची आरोग्य तपासणी देखील केली जाणार आहे. आज सकाळी 10.30 वाजल्यापासून रियाची NCB कडून चौकशी सुरु होती.
दरम्यान काही दिवसांपूर्वी NCB (Narcotics Control Bureau) च्या टीमने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी छापे टाकले. त्यानंतर रियाचा भाऊ आणि सुशांतचा मॅनेजर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान रियाच्या वडीलांनी एक स्टेटमेंट जारी केले आहे. त्यात त्यांनी मुलगा शोविक याच्या अटकेनंतर देशाचे अभिनंदन केले आहे. आता पुढील अटक माझ्या मुलीची होईल. तुम्ही मध्यम वर्गीय कुटुंबाला उद्धवस्त केल्याचे म्हटले आहे, असे म्हटले होते.