Stree 2 Teaser: श्रध्दा कपूर स्टारर 'स्त्री 2' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला

चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शकांनी दुसऱ्या भाग संदर्भात कल्पना दिली होती.

stree 2 PC INSTA

Stree 2 Teaser: श्रद्धा कपुर आणि राजकुमार राव या दोघांचा धमाकेदार 'स्त्री'चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शकांनी दुसऱ्या भागासंदर्भात कल्पना दिली होती. या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  बहुप्रतिक्षित 'स्त्री 2' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचा जोनर हॉरेर कॉमेडी असणार आहे. चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा-बडे मियाँ छोटे मियाँ'च्या अपयशानंतर निर्माते Vashu Bhagnani यांनी विकले आपले ऑफिस; 250 कोटी रुपयांचे होते कर्ज, 80% कर्मचाऱ्यांना काढून टाकले)

2018 नंतर श्रध्दा आणि राजकुमार राव एकत्र 'स्री 2' चित्रपटांत झळकणार आहे.अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझरला पाहून नेटकऱ्यांची उत्सुकता फार वाढली आहे. प्रेक्षकांनी टीझर पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशीक यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

'स्त्री 2' चा टीझर लॉच केल्यानंतर दिग्दर्शकांनी हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित करायचे ठरवले आहे. येत्या 15ऑगस्टला चंदेरीमध्ये दहशत असेल. टीझर पाहून प्रेक्षकांना हसू आणि घाबरणे आवरेनासे झाले आहे. स्त्री या चित्रपटाचा प्रसिध्द डॉयलॉग '' वो स्त्री है कुछ भी कर सकती है '' आज ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. काही दिवसांपूर्वी स्त्री 2 चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif