राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिची पहिली पोस्ट, पहा काय लिहिले
राज याच्यावर अश्लील फिल्म तयार करण्यासह अॅपच्या माध्यमातून अपलोड केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
बॉलिवूड इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. राज याच्यावर अश्लील फिल्म तयार करण्यासह अॅपच्या माध्यमातून अपलोड केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राजच्या अटकेनंतर काही कलाकार पुढे येत त्यांनी आपले मत मांडले आहे. काही जणांनी राज याला सपोर्ट केला आहे तर काहींनी त्याच्या विरोधात होते. याच दरम्यान, शिल्पा शेट्टी आतापर्यंत गप्प होती. पण आता नवऱ्याच्या अटकेनंतर पहिल्यांदाच शिल्पा हिने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट खुप काही सांगून जाते.
शिल्पा शेट्टी हिने इंस्टाग्रामवर एका स्टोरीत फोटो शेअर केला आहे. तो फोटो जेम्स थर्बर यांच्या पुस्तकातील आहे. त्या पानावर जीवंत राहण्यासह आव्हानांसंदर्भात काही गोष्टी लिहिल्या आहेत. पुस्तकाच्या पानावर असे लिहिले आहे की, रागामध्ये पाठी वळून पाहू नका किंवा भीतीने पुढे पाहू नका पण जागृकतेने पहा. आपण रागाने पाठी पाहणाऱ्या लोकांना पाहतो तर ती अशी माणस असतात ज्यांनी आपल्याला दुखावण्यासह ज्या निराशा आणि जे दुर्भाग्य आपण सहन केले आहे. आपण या भीतीपोटी तत्पर राहतो की आपण नोकरी गमावू शकतो. एखाद्या आजारपणाला बळी पडू शकतो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आपल्याला ज्या ठिकाणी राहण्याची आवश्यकता आहे ती हिच आहे. जे काही आता घडत आहे किंवा काय होऊ शकते याच्या बद्दल उत्सुकता बाळगू नका तर पूर्णपणे जागृक रहा की हे काय आहे.(Raj Kundra ने अटकेपासून बचाव करण्यासाठी पोलिसांना दिली होती 25 लाखांची लाच, यश ठाकूर याचा दावा)
यामध्ये पुढे असे लिहिण्यात आले आहे की, मी एक दीर्घ श्वास घेतो आणि माहिती करुन घेतो की मी जीवंत आणि नशीबवान आहे. यापूर्वी सुद्धा आव्हानांचा सामना केला आहे आणि भविष्यात सुद्धा आव्हानांचा सामना करण्यापासून बचाव करीन. आज मला आयुष्य जगण्यासाठी कोणीही मला चुकवू शकत नाही. या नोटच्या माध्यमातून शिल्पाने सध्याच्या परिस्थिती संदर्भात आपली स्थिती जाहीर केली आहे. तर राज कुंद्रा याला अश्लील व्हिडिओ संबंधित 19 जुलै रोजी अटक केली आहे.