Sherlyn Chopra Hot Photo: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल ला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले होते. लोकांच्या मनात कोरोनाविरोधात लढण्यासाठी विश्वास निर्माण व्हावा, यासाठी मोदींनी हे आवाहन केलं होतं. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी तसेच बॉलिवुड कलाकारांनी आप-आपल्या घरात दिवे लावले.
हॉट मॉडेल शर्लिन चोपडाने (Sherlyn Chopra) देखील मोदींचे आवाहन स्वीकारत आपल्या घरात दिवे तसेच मेनबत्या पेटवल्या. परंतु, यावेळचा शर्लिनचा अंदाज पाहून नेटीझन्सची झोप उडाली आहे.
शर्लिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिवे लावतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत शर्लिन खूपच हॉट दिसत आहे. तिने लाल रंगाची बिकिनी घातली आहे. तिच्या चारही बाजूंनी मेणबत्या पेटवल्या आहेत. या फोटोला शर्लिनने 'ख़्वाहिशों से नहीं गिरते फल झोली में..वक़्त की शाखा को ए दोस्त हिलाना होगा..कुछ नहीं होगा अंधेरे को बुरा बोलने से..अपने हिस्से का दिया ख़ुद जलाना होगा', असं कॅप्शन दिलं आहे. (हेही वाचा - कोरोना व्हायरस वरील शॉर्ट फिल्म मध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, प्रियंका चोप्रा यांच्या समवेत झळकणार अनेक सेलिब्रिटी; जाणून घ्या कुठे, कधी पाहाल ही फिल्म (Watch Video))
शर्लिन चोपडा नेहमी आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. दरम्यान, रविवारी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. बॉलिवुडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आशेचा दिवा लावला. देशातील कोरोनाचा अंधःकार दूर करण्यासाठी अक्षय कुमार, तापसी पन्नू, विक्की कौशल यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या घरात दिवे लावले होते.