Shefali Jariwala Death: 15 वर्षांपासून शेफाली जरीवाला 'या' आजाराशी झुंजत देत होती; मुलाखतीत केला 'होता' खुलासा

ई-टाईम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, शेफाली जरीवाला तिच्या आरोग्याच्या समस्येबद्दल बोलली होती. ज्यामुळे तिला इंडस्ट्रीपासून दूर राहावे लागले.

Shefali Jariwala Death: 15 वर्षांपासून शेफाली जरीवाला 'या' आजाराशी झुंजत देत होती; मुलाखतीत केला 'होता' खुलासा
Shefali Jariwala (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Shefali Jariwala Death: बॉलीवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) चे आज निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या अचानक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. 'कांटा लगा गर्ल' (Kata Laga Girl) म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीच्या जाण्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेफाली जरी चित्रपटसृष्टीत फारशी सक्रिय नसली तरी, ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. एका जुन्या मुलाखतीत, अभिनेत्रीने स्वतःच खुलासा केला की ती एका रात्रीत प्रसिद्ध होऊनही इंडस्ट्रीपासून दूर का राहिली? अभिनेत्रीने सांगितले होते की ती 15 वर्षांपासून एका गंभीर आजाराने ग्रस्त होती. हा आजार तिच्या कारकिर्दीत अडथळा बनला होता.

शेफाली जरीवालाने मुलाखतीदरम्यान केला होता मोठा खुलासा -

ई-टाईम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, शेफाली जरीवाला तिच्या आरोग्याच्या समस्येबद्दल बोलली होती. ज्यामुळे तिला इंडस्ट्रीपासून दूर राहावे लागले. अभिनेत्रीने सांगितले होते की, ती 15 वर्षांची असताना तिला अपस्माराचा झटका आला होता. शेफालीने सांगितले होते की तिला आठवते की तिच्यावर अभ्यासाबाबत खूप दबाव होता. तणाव आणि चिंतेमुळे तिला झटके येण्याची शक्यता असते. या आजाराने तिचा आत्मविश्वास डळमळीत केला होता. (हेही वाचा - Shefali Jariwala Dies: बॉलीवूडची ‘कांटा लगा’ गर्ल, 'बिग बॉस 13' स्पर्धक अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

वयाच्या 15 व्या वर्षी शेफाली जरीवालाला झटके -

दरम्यान, शेफाली जरीवालाने पुढे सांगितले की, शालेय शिक्षणादरम्यान तिला वर्गात, स्टेजच्या मागे, रस्त्यावर आणि इतर ठिकाणी झटके येत असतं. ज्यामुळे तिचा आत्मविश्वास कमी होत असे. अर्थातच, 'कांटा लगा' या अल्बमनंतर तिला एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली आणि ती प्रत्येक घरात लोकप्रिय झाली. तथापि, इतकी प्रसिद्धी मिळवूनही, शेफाली जरीवालाने स्वतःला इंडस्ट्रीपासून दूर केले. (हेही वाचा - Shefali Jariwala Last Post: शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट व्हायरल; सिद्धार्थ शुक्लाला मिठी मारतानाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने काय म्हटलं होतं? जाणून घ्या)

मुलाखतीदरम्यान यामागील कारण स्पष्ट करताना शेफाली जरीवालाने सांगितले होते की, 'कांटा लगा' हे गाणे प्रसिद्ध झाल्यानंतर लोक मला विचारायचे की मी काम का करत नाही. आता मी त्यांना सांगू शकते की अपस्माराच्या झटक्यामुळे मी जास्त काम करू शकत नव्हते. मला माहित नव्हते की पुढचा झटका कधी येईल. हे 15 वर्षे चालू राहिले. मला स्वतःचा अभिमान आहे की मी माझ्या आजारातून बरी होऊ शकले. शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आलेला नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2025 01:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).