Shefali Jariwala Last Post: शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट व्हायरल; सिद्धार्थ शुक्लाला मिठी मारतानाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने काय म्हटलं होतं? जाणून घ्या

या पोस्टमध्ये शेफालीने तिचा बिग बॉस-13 चा मित्र सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) ला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत शेफालीने सिद्धार्थ शुक्लाची आठवण करून देणारे भावनिक कॅप्शन लिहिले आहे.

Shefali Jariwala Last Post: शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट व्हायरल; सिद्धार्थ शुक्लाला मिठी मारतानाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने काय म्हटलं होतं? जाणून घ्या
Shefali Jariwala Last Post (फोटो सौजन्य - X/@shefalijariwala)

Shefali Jariwala Last Post: बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले. शेफाली हृदयाशी संबंधित आजारांसह इतर काही आजारांनी ग्रस्त होती. शुक्रवारी रात्री शेफालीला अचानक छातीत दुखू लागले ज्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केले. आता शेफालीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे कारण तपासले जात आहे. अशा परिस्थितीत, शेफालीची एक्सवरील शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये शेफालीने तिचा बिग बॉस-13 चा मित्र सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) ला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत शेफालीने सिद्धार्थ शुक्लाची आठवण करून देणारे भावनिक कॅप्शन लिहिले आहे. सिद्धार्थ शुक्लाचेही वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

शेफालीच्या मृत्यूने चित्रपट सृष्टीला मोठा धक्का -

काट लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला खूप तंदुरुस्त होती. ती दररोज जिम करायची. शेफाली अनेकदा तिच्या फिटनेसचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असे. शेफालीचा एवढा फिटनेस असूनही तिचे अकाली निधन झाले. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी जगाला निरोप देणाऱ्या शेफालीच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. चित्रपट कलाकारांनी शेफालीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मिका सिंगसह अनेक चित्रपट कलाकारांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही बातमी शेअर केली आहे आणि शेफालीला श्रद्धांजली वाहिली आहे. (हेही वाचा - Shefali Jariwala Dies: बॉलीवूडची ‘कांटा लगा’ गर्ल, 'बिग बॉस 13' स्पर्धक अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

शेफाली जरीवाला शेवटची पोस्ट - 

शेफाली जरीवालाने 2002 मध्ये 'कांता लगा' या गाण्याने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. या गाण्याने शेफालीला सुपरहिट नायिका बनवले. त्यानंतर शेफाली चित्रपटांमध्ये काम करत राहिली. चित्रपटांसोबतच शेफालीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले.  (हेही वाचा: Sana Khan Mother Passes Away: अभिनेत्री सना खानची आई सईदा यांचे निधन)

दरम्यान, शेफालीच्या अनेक मालिका आणि तिच्या भूमिका हिट झाल्या. टीव्ही मालिकांसह, शेफालीने रिअॅलिटी शोमध्येही काम केले. तथापी, तिच्या पतीसोबत डान्सिंग शोमध्येही भाग घेतला. शेफालीच्या निधनाच्या बातमीने चित्रपट सृष्टीतील सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).