Movie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतवर आधारित चित्रपटात शक्ती कपूर साकारणार नार्को अधिकाऱ्याची भूमिका; रिपोर्ट्स

विशेष म्हणजे सुशांतच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटात श्रद्धा कपूरचे वडील ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) नार्कोटिक्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'न्याय: द जस्टिस' या चित्रपटात शक्ती कपूर नारकोटिक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.

Shakti Kapoor, Shraddha Kapoor (Photo Credits : Facebook)

Movie on Sushant Singh Rajput: सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यू प्रकरणातील संभाव्य ड्रग्स एंगलच्या तपास करण्यासाठी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) ने शनिवारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ची चौकशी केली. विशेष म्हणजे सुशांतच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटात श्रद्धा कपूरचे वडील ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) नार्कोटिक्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'न्याय: द जस्टिस' या चित्रपटात शक्ती कपूर नारकोटिक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.

या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणारे जुबेर के. खान यांनी सांगितले की, 'न्याय: द जस्टिस' चित्रपटात अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याची तर शक्ति कपूर सर नार्कोटिक्स अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय सुधा चंद्रन हे या चित्रपटात सीबीआई अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकतील. (हेही वाचा - Bollywood Drugs Case: दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान समवेत 'या' व्यक्तींचे मोबाईल फोन्स NCB ने केले जप्त)

सध्या या चित्रपटाचे कास्टिंग सुरू असून चित्रिकरणाला सुरुवात झालेली नाही. या सिनेमामध्ये जुबेर महेंद्रसिंग किंवा माही नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. याशिवाय अभिनेत्री श्रेया शुक्ला सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती ची भूमिका उर्वशी नावाने साकारणार आहे. तसेच अभिनेत्री सारा अली खान, अंकिता लोखंडे आणि कृति सैनन यांची भूमिका साकारण्यासाठी कास्टिंग पूर्ण झाली आहे. या चित्रपटात सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सालियान आणि पूर्व बिजनेस मॅनेजर श्रुति मोदी यांच्यादेखील भूमिका असणार आहेत.

जुबेर ने सांगितलं की, 'चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. मात्र, चित्रपटाची कथा आणखी मोठी होत असून आणखी पात्रं जोडली जात आहेत. यात अंकिता लोखंडे, कृती सॅनॉन, सारा अली खान, सुशांतचे कुटुंब, त्याच्या बहिणी, वकील इत्यादी. माजी व्यवस्थापक दिशा सालियन आणि श्रुती मोदी, सुशांतच्या घरात काम करणारे कर्मचारी आणि मित्र अशा पात्रांसाठी कास्टिंग जवळजवळ पूर्ण झाले आहे. चित्रपटात बिग बॉसची माजी स्पर्धक सोमी खान सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनची भूमिका साकारणार आहे.