Shaitaan Movie: 'शैतान' चित्रपट लवकरच ओटीटीवर होणार प्रदर्शित, घरबसल्या पाहता येणार थरारक

या चित्रपटामुळे बॉलिवूडला भयंकर असा आगळा वेगळा हॉरर कॉन्सेप्ट मिळाला आहे.

Shaitan

Shaitaan Movie:  बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपटाचं नाव घेतलं की समोर येते ते 'शैतान' सिनेमाचे दृश्य. या चित्रपटामुळे बॉलिवूडला भयंकर असा आगळा वेगळा हॉरर कॉन्सेप्ट मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कामगिरि केली आहे. प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. लवकरच चित्रपट ओटीटीवर येणार असल्याची चर्चा होती. चित्रपटात अजय देवगण, आर माधवन आणि ज्योती यांनी कमालीचे कामगिरी केली आहे.(हेही वाचा- एल्विश यादवला जामीन मंजूर; अटकेनंतर 5 दिवसांनी तुरुंगातून सुटका)

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक ते दोन महिन्यांत ओटीटीवर पाहायला मिळतो. शैतान चित्रपट ८ मार्च रोजी रिलीज झाला होता. शैतान चित्रपट लवतकच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने अजय देवगणच्या या चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. पोस्टरवर दिसल्याप्रमाणे, नेटफ्लिक्सच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे पण अद्याप तारीख जाहिर केली नाही. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केलेली दिसत आहे.  गेल्या १४ दिवांसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे ११८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. होळीच्या सुट्ट्यांमध्ये चित्रपट आणखी कमाई करेल अशी अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटाने १६५ कोटींचे वर्ल्ड वाइड कलेक्शन केले अशी माहिती समोर आली आहे.