Shahrukh Khan (Photo Credits-Instagram)

आज सर्वत्र गोकुळाष्टमीचा (Gokulasthami) सण सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याने सुद्धा या दही हंडीचा उत्सव साजरा करताना दिसून आला. शाहरुख याने मन्नत (Mannat) वर दही हंडी फोडली असल्याचा व्हिडिओ सद्धा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मन्नत बंगल्याच्या बाहेर जमलेल्या शाहरुखच्या चाहत्यांसह त्याने दही हंडी फोडली.मात्र दही हंडी फोडताना कोणताही थर लावला नाही. पण चक्क बॉडीगार्डच्या मानेवर बसून शाहरुख दही हंडी फोडताना दिसूल आला. परंतु बॉडीगार्डला घेऊन दही हंडी फोडल्यामुळे शाहरुख सोशल मीडियात ट्रोल होत आहे.(Happy Dahi Handi 2019 HD Images: दहीहंडी उत्सवानिमत्त मराठी शुभेच्छा, HD Greetings, Wallpapers, Wishes च्या माध्यमातून मित्र परिवारासोबत शेअर करा)

 

View this post on Instagram

 

#happyjanmashtami 🙏 #shahrukhkhan breaks dahi handi on this occasion @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

तसेच नेटकऱ्यांनी शाहरुखने दही हंडी फोडल्याचा आनंद नाही तर बॉडीगार्डला झेलाव्या लागलेल्या वजनाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. तर आजचा गोकुष्टमीचा सण साजरा केला जात असून महाराष्ट्रातील पुरस्थितीमुळे यंदा दही हंडीचा उत्सव साधेपणाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जात आहे.